
पुणे महानगरपालिकेसाठी 15 तारखेला होणार मतदान
पवारांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात शहरी गरीब योजना
वेताळ टेकडीवर संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प
पुणे: माझ्या पुढाकारातून शहरी गरीब आरोग्य योजना राबवली. एक लाख ७६ हजार जणांना त्याचा आतापर्यंत थेट फायदा झालेला आहे. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पुणे महानगरपालिकेने गरजू रुग्णांची बिले भरण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांना अदा केली आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उमेदवार नीलेश निकम यांनी सांगितली. गोखलेनगर- वाकडेवाडी, प्रभाग क्रमांक ७ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट, अंजली विनोद ओरसे, आशा राजू साने यांच्या प्रचारासाठी झालेल्या कोपरा सभांमध्ये निकम बोलत होते.
निकम म्हणाले ” शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही शहरी गरीब योजना तयार करण्यात आली होती. मी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना ती सुरू झाली. १४-१५ वर्षापासून या योजनेचा लाभ संपूर्ण पुणे शहरातील गरीब, गरजू रुग्णांना मिळतो आहे. अतिशय उचलून धरली गेलेली ही योजना आहे.”
निकम यांनी सांगितले की कोरोना काळामध्ये सुद्धा माझ्यासह दत्ता बहिरट, राजेश साने, विनोद ओरसे यांनी खूप चांगले काम केले आहे. आरोग्य शिबिरे घेणे, जे रुग्ण आजारी असतील त्यांना रुग्णालयात दाखल करणे, कुटुंबातील व्यक्ती मृतदेहापासून भितीने लांब राहत असताना स्वतः किंवा कार्यकर्त्यांमार्फत अंत्यसंस्काराची व्यवस्था करणे, गरजूंना अन्न धान्य पुरवठा करणे, रिक्षावाल्यांना अनुदान मिळवून देणे, अपंगांना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देणे असे अनेक प्रकारचे कामे या प्रभागामध्ये गेल्या सात- आठ वर्षांमध्ये करण्यात आली. अपंगांना सुद्धा विनामूल्य पीएमपीएल प्रवास आणि सहाय्यक उपकरणासाठी योजना सुरू केली होती. ती आजही सुरू आहे.
नीलेश निकम यांनी सांगितले की वेताळ टेकडीवर संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबवला. देशातील हा पहिलाच असा प्रकल्प आहे. महानगरपालिकेने पाच कोटी रुपयांची तरतूद वेताळ टेकडीच्या संवर्धनासाठी केली होती. वनविभागाच्या जागेला भिंत बांधणे, कुंपण घालणे, २७ किलोमीटर पर्यंत सलग समतल चर तयार करणे यामुळे करोडो लिटर पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरते.
निकम म्हणाले ” टेकडीवरील सुमारे दहा एकर क्षेत्रातील खाणीला बंधारा बांधल्यामुळे पाणी स्तर सहा फुटांनी वाढला. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा सुद्धा वाढलेला आहे. स्थानिक देशी प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण वेताळ टेकडीवर करण्यात आले आहे. त्यामुळे टेकडी उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगार दिसते. प्रभागामध्ये उद्याने निर्माण करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन मी, दत्ता बहिरट, विनोद ओरसे यांनी पंचवटीपर्यंत निघणाऱ्या बोगद्याला विरोध केला आहे. ”
पुण्यात तब्बल 12 हजार पोलिसांचा फौजफाटा; महापालिका मतदानासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
निकम यांनी सांगितले की मी नगरसेवक असताना शिवाजी नगर परिसरात गोखले नगर, जनवाडी भागात रस्ता रुंदीकरण, सुशोभीकरण अशी कामे मार्गी लागली. गोखलेनगर हा आज स्वच्छ, सुंदर भाग बनला आहे. नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सुद्धा आशा नगर मध्ये पाण्याची टाकी बांधली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होतो. विनोद बोरसे यांनी सुद्धा गोखलेनगर जनवाडी परिसरामध्ये सामाजिक कार्य सातत्याने केले आहे. सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. पाणीपुरवठा योजना राबवली. मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी दिला. आशा राजेश साने यांनीही ३१५ जळीतग्रस्तांना घरे बांधून देण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला होता. झोपडपट्टी वासियांना पाणीपुरवठा देणे सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा स्वच्छता याविषयी काम करणे याची आठवण या भागातील नागरिकांना आहे. त्यामुळे आमचे सर्व उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील.