Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रेला सुरूवात, संधी मिळाल्यास अधिक विकास करू; युगेंद्र पवार

ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत. पक्षाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात स्वत:च्या घेतलेले छायाचित्र या स्वाभिमान यात्रेच्या पोस्टरवर छापण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2024 | 01:30 AM
बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रेला सुरूवात, संधी मिळाल्यास अधिक विकास करू; युगेंद्र पवार

बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रेला सुरूवात, संधी मिळाल्यास अधिक विकास करू; युगेंद्र पवार

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारपासून स्वाभिमान यात्रा सुरू केली. श्रीक्षेत्र कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन या यात्रेस त्यांनी सुरुवात केली. बारामती तालुक्यातील मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस उपस्थित राहत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला तसेच इतर भागात घोंगडी बैठकांच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपणास संधी मिळाल्यास बारामतीचा अधिक मोठ्या प्रमाणावर आपण विकास करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू केलेल्या जनसन्मान यात्रेची चर्चा सर्वत्र रंगली असताना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामती मध्ये स्वाभिमान यात्रा सुरू करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यास सुरुवात केल्याचे या यात्रेवरून स्पष्ट झाले आहे. बारामती शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये या स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून युगेंद्र पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

कण्हेरी येथील मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता युगेंद्र पवार आपल्या यात्रेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ९.१५ वाजता माळावरच्या देवीचे दर्शन घेऊन ते पक्ष कार्यालयात १२ वाजेपर्यंत उपस्थित राहिले, यावेळी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. दुपारी २ वाजता मुढाळे येथील बैलगाडा शर्यतीस भेट देऊन त्यांनी बैलगाडा मालक तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर माळेगाव बुद्रुक सह गोफणे व वाघमोडे वस्ती, माळेगांव कारखाना, येळे ढाळे वस्ती येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपणास संधी मिळाल्यास बारामतीचा आपण गतीने मोठ्या प्रमाणावर विकास करून दाखवू असे आश्वासन त्यांनी यावेळी या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एस एन जगताप, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर, शहराध्यक्ष आरती शेंडगे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही स्वाभिमानी यात्रा १२ दिवसांची असून बारामती तालुक्यातील सर्व गावांना युगेंद्र पवार भेटी देणार आहेत. पक्षाच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात स्वत:च्या घेतलेले छायाचित्र या स्वाभिमान यात्रेच्या पोस्टरवर छापण्यात आले आहे. ‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या आपल्या पक्षाचा आणि ‘पवारसाहेबां’चा पुरोगामी प्रागतिक विचार बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचविणे हा या यात्रेचा उद्देश आहे. लोकसभेत दिलेल्या साथीबद्दल बारामती तालुक्यातील जनतेप्रति कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत.
– युगेंद्र पवार.

Web Title: Ncp sharadchandra pawar faction yugendra pawar started swabhiman yatra in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 01:30 AM

Topics:  

  • baramati news
  • Maharashtra Assembly election 2024
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?
1

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल
2

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.