Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’

पथ, विद्युत, आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, यावर प्रशासकीय वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 02:35 AM
पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’
Follow Us
Follow Us:

शहरात बेकायदा ओव्हरहेड केबल्सचे जाळे दिवसेंदिवस वाढले
नागरिकांच्या जीवीताला निर्माण झाला धोका
पालिका एसओपी तयार करणार

पुणे: पुणे शहरात बेकायदा ओव्हरहेड केबल्सचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले असून, या लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर, पदपथांवर आणि चौकाचौकांत लटकलेल्या केबल्समुळे अपघातांच्या घटना घडत असतानाही आजवर ठोस धोरण नसल्याने केबलधारक कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू होता. मात्र आता पुणे महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्यासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे हे आयटी हब म्हणून ओळखले जात असताना इंटरनेट, डीटीएच आणि ब्रॉडबँड सेवांचा प्रचंड विस्तार झाला आहे. मात्र या सेवा पुरविणाऱ्या अनेक खासगी कंपन्यांनी महापालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत विजेचे खांब, झाडे, इमारती यांवरून सर्रास ओव्हरहेड केबल्स टाकल्या. या केबल्स तुटून रस्त्यावर पडणे, वाहनचालकांच्या गळ्याला किंवा अंगाला अडकणे, पक्ष्यांचा बळी जाणे अशा घटना वारंवार घडत आहेत. तरीही कारवाई तात्पुरती आणि दिखाऊ स्वरूपाचीच राहिली.

Pune ZP Election 2026 : प्रचार संपल्यानंतरही छुप्या हालचाली; आचारसंहितेच्या पालनावर प्रश्नचिन्ह

महापालिकेकडे ओव्हरहेड केबल काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने कारवाईचा भार प्रामुख्याने विद्युत विभागावर येतो. मात्र पथ, विद्युत, आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, यावर प्रशासकीय वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. परिणामी केबल काढण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

दरम्यान, शहरातील ओव्हरहेड केबलचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी एका महिन्यात एसओपी तयार केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. शहरात हजारो विजेचे खांब आणि फिडर पॉईंट असून, अनेक ठिकाणी भूमिगत कामे झाल्यानंतरही खांब हटवले जात नाहीत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत अशा खांबांवर कारवाई करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अफवांचा महापूर; सोशल मीडियावर खोट्या कथांचा धुमाकूळ

दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात सुमारे १८ हजार किलोमीटरहून अधिक अनधिकृत ओव्हरहेड केबल्स आढळून आल्या होत्या. केबल भूमिगत करण्यासाठी प्रति रनिंग मीटर १२ हजार रुपये शुल्क निश्चित असताना, हे शुल्क वाचवण्यासाठी कंपन्यांकडून बेकायदा केबल टाकण्यात आल्याचे आरोप आहेत. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे महसूल बुडत असल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Pmc naval kishore ram sop will be prepared for cable removal pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
1

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
2

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
3

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर
4

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.