Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणक्यावर पोलिसांची नजर; २०० ठिकाणी मोजली जाणार ध्वनी पातळी

Pune Ganeshotsav 2026: ध्वनिप्रदूषण नियंत्रणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर एमपीसीबीकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील २०० केंद्रांवर प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी बाह्य पर्यावरण संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 06:52 PM
पुणे गणेशोत्सव 2026

पुणे गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई
  • ‘एमपीसीबी’कडून पुण्यातील २०० ठिकाणी ध्वनी पातळीचे मोजमाप
  • नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास पोलिसांकडून कारवाई
पुणे/Ganeshotsav 2026: गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुणे शहरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील तब्बल २०० ठिकाणी डेसिबल मीटरद्वारे ध्वनी पातळीची नोंद घेतली जाणार आहे. ढोल-ताशे, ध्वनिक्षेपक आणि अन्य ध्वनिवर्धक उपकरणांमुळे आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याचे आढळल्यास प्रथम संबंधितांना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या जातील. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सोमवारपासून ( ता.१४) ध्वनी पातळी मोजण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दहा दिवस दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री १२ या वेळेत विविध ठिकाणी ध्वनी पातळीची नोंद घेतली जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यानही या मोहिमेअंतर्गत ध्वनी पातळीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra Politics: रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याला नोटिस, दिल ‘हा’ इशारा

बाह्य संस्थांच्या मदतीने २०० केंद्रांवर लक्ष

ध्वनिप्रदूषण नियंत्रणाबाबत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर एमपीसीबीकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील २०० केंद्रांवर प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी बाह्य पर्यावरण संस्थांची मदत घेण्यात आली आहे. ‘अश्वमेध’ आणि ‘महाबळ एन्व्हायरनमेंट’ या संस्थांच्या माध्यमातून महाविद्यालयांतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक निर्धारित ठिकाणी ध्वनी पातळीची नोंद घेऊन त्याची माहिती संबंधित यंत्रणेकडे देणार आहेत. त्यामुळे उत्सवातील गर्दीची ठिकाणे, मंडळांचे परिसर तसेच मिरवणूक मार्गांवरील ध्वनी पातळीवर यंदा अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान पुणे शहरातील २०० ठिकाणी ध्वनी पातळीचे मॉनिटरिंग सुरू करण्यात आले आहे. पुढील दहा दिवस दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री १२ या वेळेत नोंद घेतली जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे.’
– कार्तिकेय लंगोटे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

कर्णकर्कश डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात पुणेकर रविवारी रस्त्यावर उतरले. सकाळी बालगंधर्व चौक येथून जंगली महाराज रस्त्याने पुणे महानगरपालिकेपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. ‘डीजे बंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत नागरिकांनी ध्वनीप्रदूषणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’च्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात पुणेकर यात सहभागी झाले होते.

Web Title: Police action taken if noise limit is exceeded during ganeshotsav mpcb noise levels at 200 places in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • MPCB
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे
1

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
2

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा  Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा
3

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
4

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.