Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव! कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस, ओढ्यांना पूर अन् वीटभट्ट्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढ्यांना पूर आला असून वीटभट्ट्यांचे १५ लाखांचे नुकसान झाले, तर अतीटमध्ये वीज पडून गाय ठार झाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 09:52 PM
खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव! कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस, ओढ्यांना पूर अन् वीटभट्ट्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
Follow Us
Follow Us:

 

  • खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव!
  • कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस
  • ओढ्यांना पूर अन् वीटभट्ट्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
प्रतिनिधी खंडाळा : तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आले. तासभर झालेल्य पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतीट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शुक्रवारी या परिसरात नागरिकांना उकाडा असाह्य झाला होता.अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. तर दुपारी दिड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जेनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहु लागले.

ट्रकमधून लोखंडी पाइप घसरले अन्…; खंडाळा घटातील भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. कण्हेरी परिसरातील विटभट्टीवर तयार केलेल्या कच्च्या विटांवरील झाकलेले कागद वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तयार विटा भिजून सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

दरम्यान,अतिट येथे गोठ्याजवळ बांधलेल्या गाईवर वीज पडून ती जागीच ठार झाली. यामध्ये रामदास राजाराम जाधव यांचे मोठे नुकसान झाले. असवली ,कण्हेरी, लोहोम व परीसरात पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कण्हेरी परिसरातील वीटभट्टी चालक आणि अतीट येथील बाधित शेतकरी अडचणीत आले आहेत.

कंपनी प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतवर केलेल्या आरोपांबाबत केसुर्डी ग्रामपंचायत आक्रमक

Web Title: Pre monsoon rain wreaks havoc in khandala taluka satara heavy damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • khandala
  • mansoon
  • rain

संबंधित बातम्या

Tomato Price: महागाईचा आणखी एक झटका! स्वयंपाकघराचं गणित बिघडणार; टोमॅटोचे दर गगनाला भिडणार
1

Tomato Price: महागाईचा आणखी एक झटका! स्वयंपाकघराचं गणित बिघडणार; टोमॅटोचे दर गगनाला भिडणार

Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात कार चालवताय? ‘या’ चुका अजिबात करू नका, नाहीतर होईल मोठा अपघात!
2

Monsoon Driving Tips: मुसळधार पावसात कार चालवताय? ‘या’ चुका अजिबात करू नका, नाहीतर होईल मोठा अपघात!

Satara Rain Alert: साताऱ्यात अतिवृष्टीचा हाहा:कार! रस्ते-पूल बंद, NDRF तैनात, तर २७४ नागरिकांना…
3

Satara Rain Alert: साताऱ्यात अतिवृष्टीचा हाहा:कार! रस्ते-पूल बंद, NDRF तैनात, तर २७४ नागरिकांना…

Jawali Landslide News: जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली
4

Jawali Landslide News: जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.