
Pune airport sees 44 percent growth in eight months
पुणे विमानतळाने पुणे आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर कार्गो वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुणे विमानतळावर ३१३०३.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी झाली होती. यंदा त्यात तब्बल १३७४७ मेट्रिक टनांची भर पडून एकूण कार्गो वाहतूक ४५ हजार मेट्रिक टनांच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत ६२.४ मेट्रिक टन असलेली आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक यंदा २२८.७ मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कार्गोची हाताळणी तीन पटींहून अधिक वाढली आहे.
दरम्यान, देशांतर्गत कार्गो वाहतुकीतही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील ३१२४१.३ मेट्रिक टनांवरून यंदा ती ४४८२२ मेट्रिक टनांवर पोहोचली असून, ही वाढ सुमारे ४३.५ टक्के आहे.
पुणे विमानतळावरून ४५०५०.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी
जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत पुणे विमानतळावरून ४५,०५०.७ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ ४३.९ टक्के आहे. विशेष म्हणजे २०२६ मधील या आठही महिन्यांत कार्गो वाहतुकीत सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे.
ऑगस्टमध्ये ६०४६.८ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी
महिनानिहाय आकडेवारीतही पुणे विमानतळाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. मे आणि ऑगस्ट २०२६ मध्ये कार्गो वाहतुकीने सहा हजार मेट्रिक टनांचा टप्पा पार केला. मे महिन्यात सर्वाधिक ६,१४७.८ मेट्रिक टन, तर ऑगस्टमध्ये ६,०४६.८ मेट्रिक टन कार्गोची हाताळणी करण्यात आली. ऑगस्टमधील वाढ गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत सुमारे ४५.९ टक्के आहे.
Pune Airport News : पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला उशीर; प्रवासी ९ तास खोळंबले