पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेअंतर्गत सध्या चार शहरांशी विमान सेवा जोडण्यात आले आहे.या मार्गांमुळे दुर्गम भागांपर्यंत हवाई सेवा पोहोचत असून,संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे.
पुणे येथील लोहगाव विमानतळावरून सध्या ३७ शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता यामध्ये लवकरच १५ नवीन मार्गांची भर पडणार आहे. अशी माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पक्ष्यांच्या घिरट्यांमुळे काही दिवसांपूर्वी ३ तास विमान वाहतूक ठप्प झाली होती. एक दिल्ली-पुणे विमान तर सुरतला वळवावे लागले, कारण लँडिंग पॉइंटवर पक्ष्यांची झुंड होती.