
पुणे महानगरपालिका निवडणुकीत येणार रंगत
15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल
व्यापारी समुदायातील उमेदवाराला मोठा पाठिंबा
विश्रांतवाडी : “मी स्वतः एक दुकानदार आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचे प्रश्न, अडचणी आणि संघर्ष मला वेगळे सांगावे लागत नाहीत,” असे मत पुण्यातील प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार सुधिर सुभाष वाघमोडे यांनी व्यक्त केले. ट्रेडर्स अँड कस्टमर वेल्फेअर असोसिएशन आयोजित व्यापारी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी व्यापाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या की, पहिल्यांदाच आपल्या व्यापारी समुदायातील, स्वतः दुकान चालवलेला उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो आहे.
व्यापारी वर्गाकडून मिळालेला हा विश्वास माझ्यासाठी जबाबदारी वाढवणारा आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न, परवाने, पार्किंग, करप्रणाली, सुरक्षितता आणि व्यवसायपूरक सुविधा यासाठी ठोस काम केले जाईल, असेही वाघमोडे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात व्यापारी बांधवांनी निवडणुकीसाठी संपूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, व्यापारी-ग्राहक-प्रशासन यांच्यात समन्वय साधणारे नेतृत्व देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.