पुणे: मागील महिन्यापासून गुलेन बॅरे सिंड्रोम च्या (जीबीएस) रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डिएसके विश्व या भागात मागील महिन्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. महापालिकेकडून या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत २ लाख तर ज्यांच्याकडे शहरी गरीब योजनेचे कार्ड नाही त्या रुग्णांना १ लाखाची मदत देण्यात येते. ही मदत २६ जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे.
मात्र, या साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. त्यामुळे नवीन बाधित रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. याशिवाय या आजाराचे रुग्ण वर्षभर सापडत असल्याने सर्वांनाच मदत देणे शक्य नाही, त्यामुळे असल्याने उपचारासाठीची दिली जाणारी आर्थिक मदत १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
मात्र, या आजाराचा साथीचा समूळ नायनाट झालेला नाही. याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी तसेच केंद्र सरकारच्या महामारीच्या विभागाने जाहीर केलेले नाही. त्यामुळे महापालिकेने जीबीएसच्या रुग्णांना दिली जाणारी मदत बंद करू नये, अशी मागणी विविध संघटना व माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी या मदतीन एक महिन्याची म्हणजेच ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर जीबीएस बाधीतांची संख्या विचारात घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
३८ रुग्णांना ४८ लाखांची मदत
महापालिकेकडून आत्तापर्यंत बीएस आजाराने बाधित झालेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २ लाखाची तर मदत देण्यात आली तर शहरी गरीब योजनेत बसत नसलेल्या २८ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २८ लाखांची मदत देण्यात आली आहे.
पुण्यात GBS ने पुन्हा डोके वर काढले
सिंहगड रस्ता भागात पुन्हा एकदा ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) चे नवीन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने सिंहगड रस्ता भागातील एकुण ४३ आर ओ प्लांट बंद केले आहेत. या प्लांट चालकांकडून नियमावलीचे पालन न केल्याने त्यांच्याविराेधात ही कारवाई केली आहे.
सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नन्हे, आंबेगाव परिसरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. जानेवारी महीन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महीन्यात जीबीएस अाजार झालेल्या रुग्णांची संख्या घटली हाेती. या भागातील जीबीएसचा धाेका कमी झाला असतानाच, गेल्या आठवड्यात या भागात नवीन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात कळविले हाेते.
पुण्यात GBS ने पुन्हा डोके वर काढले: ‘या’ भागात आढळले रूग्ण; महापालिकेने बंद केले 43 आर ओ प्लांट
जानेवारी महीन्यात जीबीएस आजार हा अशुद्ध पाण्यामुळे हाेत असल्याचे आढळून आले हाेते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती. यात ३० मधील २७ प्रकल्पांचे पाणी दूषित असल्याचे समोर आल्याने हे प्रकल्प बंद केले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धीकरणाची नियमावली घालून देण्यात आली होती. या नियमावलीनुसार प्लांट चालकांनी अर्ज केल्यानंतर त्याची पाहणी करून ताे सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. अात्तापर्यंत केवळ चार जणांना ही परवानगी दिली आहे.