Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका; ३४५ कोटींची थकबाकी थकवल्याने ‘या’ प्रॉपर्टी सील

माेठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या मिळकतींवर कारवाई करण्याची माेहीम सध्या राबविली जात आहे. या माेहीमेत सिहंगड इन्सि्टट्युटच्या वडगाव येथील या मोहिमेअंतर्गत, संस्थेच्या वडगांव बुद्रुक येथे ४३ मिळकती आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2025 | 08:02 PM
मोठी बातमी! सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा दणका; ३४५ कोटींची थकबाकी थकवल्याने ‘या’ प्रॉपर्टी सील
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:मिळकतकराची थकबाकी वसुल करण्यासाठी महापािलकेने सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या वडगाव येथील ४३ आणि काेंढवा येथील  मिळकती सील केल्या आहेत . या संस्थेच्या शहरात एकूण १२८ मिळकती असून त्यांची ३४५ काेटी रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी अाहे. डिसेंबर महीन्यात महापािलकेने एरंडवणा येथील मिळकतीच्या कार्यालयास सील ठाेकले हाेते.

महापालिकेचा कर आकारणी आणि संकलन विभाग आणि सिंहगड इन्स्टीट्युट यांच्या मिळकत करावरून न्यायालयीन वाद सुरु आहेत. ज्या मिळकतीसंदर्भात आदेश नाहीत अशा मिळकती सील करण्याची कारवाई मिळकत कर विभागाकडून केली जात आहे. यासंदर्भात उपायुक्त माधव जगताप यांनी माहीती दिली. यापुर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संबंधित संस्थेने कराची रक्कम भरली नाही, त्यामुळे महापालिकेने अवमान याचिकाही दाखल केली आहे.

माेठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या मिळकतींवर कारवाई करण्याची माेहीम सध्या राबविली जात आहे. या माेहीमेत सिहंगड इन्सि्टट्युटच्या वडगाव येथील या मोहिमेअंतर्गत, संस्थेच्या वडगांव बुद्रुक येथे ४३ मिळकती आहे. या मिळकतींचे कार्यालय सील करण्यात आले आहे. या मिळकतींची एकुण 198 काेटी 61 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. तर एरंडवणा येथील मिळकतीचे 4७ काेटी 43 लाख रुपये इतकी थकबाकी आहे.

कोंढवा बुद्रुक 6 मिळकतींची 20 काेटी 50 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. या मिळकतींची थकबाकी भरली गेली नाही तर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रीया सुरु केली जाईल असेही जगताप यांनी सांगितले. या संस्थेच्या १२८ मिळकतींची एकुण थकबाकी 345 कोटी रुपये इतकी आहे. मंगळवारी कारवाई करण्यात आलेल्या 48 मिळकतींची एकुण थकबाकी 270 कोटी इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

एरंडवणा येथील मिळकतीची २००९ सालापासून थकबाकी आहे, तर वडगाव बुद्रुक येथील मिळकतींची २००२ आणि काेंढवा बुद्रुक येथील मिळकतींची २००८ सालापासून थकबाकी आहे.

शहरातील एकूण ४३८ शासकीय मिळकतींची ९३.२४ कोटी इतकी थकबाकी आहे. याबाबत सदरची थकबाकी वसूल करणेबाबत शासकीय मिळकत धारकांकडे पाठपुरावा सुरु आहे.

शहरातील टॉप १०० थकबाकीदार मिळकत धारकांची ३३४.१० कोटी इतकी थकबाकी आहे. सर्वाधिक करथकबाकी फुरसुंगीचे संतोष काटेवाल यांची १८ कोटी ४४ लाख ३७ हजार ५८५ रुपये इतकी थकबाकी आहेत.

‘‘मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी वरील पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सिंहगड इन्स्टिट्युटच्या मालमत्ता थेट सील केल्या जात नाही. तर त्यांच्या मुख्य कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे. शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाते. थकबाकी वसूल केली जाणार आहे.’’

  – माधव जगताप, प्रमुख, मिळकत कर आकारणी विभाग, पुणे महापालिका.

Web Title: Pune corporation seal sinhgad institute property vadgaon and kondhwa about 345 crore tax arrears marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 08:02 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Sinhgad

संबंधित बातम्या

Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब
1

Mohol Vs Dhangekar”… नाहीतर मंत्रिपद वाचवा”; मोहोळांनी जैनमुनींची भेट घेताच धंगेकरांचा नवीन बॉम्ब

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”
2

Maharashtra Politics: मोहोळांंवर आरोप करताच एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, “धंगेकरांना काय…”

पुणेकरांनो, काळजी घ्या ! पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
3

पुणेकरांनो, काळजी घ्या ! पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी! क्रिकेट अकादमीचे नवीन स्पोर्ट्स अरेना हडपसरमध्ये सुरु
4

क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी! क्रिकेट अकादमीचे नवीन स्पोर्ट्स अरेना हडपसरमध्ये सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.