Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

निलीमा वय १४ वर्ष (नाव बदलेले आहे) या अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात ससून रुग्णालयाने आयुष्याचा नवा किरण आला आहे. ससून रुग्णालयातीळ उपचारराने निलीमा पुन्हा एकदा उभी राहिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 11:45 PM
PUNE NEWS: 14-year-old Neelima, bedridden for ten months, gets back on her feet after treatment in Sassoon

PUNE NEWS: 14-year-old Neelima, bedridden for ten months, gets back on her feet after treatment in Sassoon

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रकांत कांबळे/नवराष्ट्र : निलीमा वय १४ वर्ष (नाव बदलेले आहे) या अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात ससून रुग्णालयाने नवी उमेद निर्माण केली आहे. अचानक ताप आल्यानंतर निलीमा आजारी पडली. गावातील डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर ताप उतरला, मात्र त्यानंतर तिच्या वागण्यात मोठा बदल दिसून आला. ती कमी बोलू लागली, खेळणे बंद झाले, मैत्रिणींशी संवाद तुटला आणि ती सतत खाटेवर पडून राहू लागली. हळूहळू तिने खाणे-पिणे आणि डोळे उघडणेही बंद केले. तब्बल दहा महिने ती या अवस्थेत होती.

दरम्यान विविध ठिकाणी उपचार करूनही कोणताही फरक न पडल्याने अखेर तिला पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मनोविकारशास्त्र विभागात दाखल करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी दाखल केल्यानंतर योग्य उपचार सुरू केल्यामुळे निलीमाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.सध्या निलीमा आईच्या मदतीने स्वतःच्या पायावर चालू लागली असून नियमितपणे जेवणही करत आहे. पुढील आठ दिवसांत ती पूर्णपणे बरी होऊन घरी जाईल, अशी माहिती मनोविकारशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शशिकांत थोरात यांनी दिली.

हेही वाचा : Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

दुर्मिळ आजार

डॉक्टरांच्या मते, १४ वर्षांच्या मुलीत अशा प्रकारचा आजार आढळणे हे दुर्मिळ आहे.निलीमाच्या कुटुंबात काही प्रमाणात तणावाचे वातावरण होते. वडिलांच्या व्यसनामुळे घरात वारंवार वाद होत असत. या ताण-तणावाचा मोठा परिणाम मुलीच्या मानसिक आरोग्यावर झाला.

निलीमाच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची

निलीमाच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अंत्यत हालाखीची असून तिला उपचारासाठी मुंबईला देखील नेण्यात आले होत.परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट जवळचे आणि बाहेरून घेतलेले सर्व पैसे खर्च झाले.पण उपचारात काहीही सुधारणा झाली नाही.

हेही वाचा : मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

ससून रुग्णालयातील मानसोपचार विभागातील डॉक्टर माझ्यासाठी देवासारखे आहेत. त्यांनी केलेल्या उपचारामुळे माझी मुलगी पुन्हा चालायला, बोलायला लागली. मी आयुष्यभर या डॉक्टरांची ऋणी राहीन. निलीमाची आई रुग्ण आमच्याकडे आली तेव्हा तिची अवस्था अत्यंत गंभीर होती. ती चालत नव्हती, बोलत नव्हती आणि सतत झोपून असायची. वय केवळ १४ वर्षे असल्यामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक होती. योग्य उपचारांनंतर हळूहळू सुधारणा दिसून आली. कुटुंबीयांनी आशा सोडली असतानाही आमच्या संपूर्ण टीमने प्रयत्न करून तिला बरे केले, याचे आम्हाला समाधान आहे. डॉ.शशिकांत थोरात, मनोविकारशास्त्र विभाग प्रमुख, ससून रुग्णालय

Web Title: Pune news bedridden 14 year old neelima wakes up after treatment in sassoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:45 PM

Topics:  

  • health
  • pune news
  • Pune Sassoon Hospital

संबंधित बातम्या

Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा
1

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला
2

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा
3

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी
4

नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.