Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

Pune Ganeshotsav:  आगमन मिरवणुकांनंतर ठरलेल्या वेळेनुसार प्राणप्रतिष्ठापना सोहळे पार पडले. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिवसभर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 06:52 PM
पुणे गणेशोत्सव 2026

पुणे गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे सोमवारी थाटात आगमन
  • पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिवसभर गणेशोत्सवाचा उत्साह
  • केसरीवाडा गणपतीचे रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना 

गायत्री पवळे/Pune Ganeshotsav:
ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींचे सोमवारी थाटात आगमन झाले. आगमन मिरवणुकांनंतर ठरलेल्या वेळेनुसार प्राणप्रतिष्ठापना सोहळे पार पडले. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिवसभर गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती यांच्या १३४व्या वर्षाच्या उत्सवाला सकाळी ९ वाजता रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकातून निघालेल्या मिरवणुकीने सुरुवात झाली. प्रभात बँड, ज्ञानप्रबोधिनी, शौर्य आणि संघर्ष पथक सहभागी झाले. सकाळी ११.४५ वाजता वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती यांची सकाळी १० वाजता नारायण पेठेतील मंदार लॉज येथून आगमन मिरवणूक निघाली. नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल पथक आणि विष्णूनाद शंख पथक सहभागी झाले. दुपारी १२.१५ वाजता योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती यांची आगमन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली. विविध ढोल-ताशा पथकांच्या सहभागाने आणि फुलांनी सजविलेल्या रथातून श्रींचे आगमन झाले. दुपारी १.५५ वाजता पुनीतशेठ आणि जान्हवी बालन यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती यांची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक सकाळी ९ वाजता काढण्यात आली. दुपारी १२.३० वाजता गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा भव्य ब्रह्मणस्पती मंदिराची सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी श्रींच्या चरणस्पर्शाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यांची सकाळी ९ वाजता रमणबाग चौकातून पालखीतून आगमन मिरवणूक काढण्यात आली. बिडवे बंधूंचे सनई-चौघडा तसेच श्रीराम आणि कलावंत ढोल-ताशा पथक सहभागी झाले. सकाळी ११.३५ वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

Web Title: Pune ganeshotsav 2026 manache 5 ganpati agman mirvanuk kasba kesriwada guruji talim tulshibaug tambdi jogeshwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • pune ganpati

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…
1

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.