Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: पुण्यात आठही मतदारसंघात होणार टफ फाईट; कोण जिंकणार, कोण हरणार? प्रतीक्षा निकालाची

चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2024 | 02:04 PM
Pune: पुण्यात आठही मतदारसंघात होणार टफ फाईट; कोण जिंकणार, कोण हरणार? प्रतीक्षा निकालाची
Follow Us
Follow Us:

पुणे: शहरातील आठ मतदारसंघात काय हाेणार ? महाविकास आघाडीच्या जागा वाढणार  का ? धंगेकर येणार की रासने ? अपक्ष उमेदवारांचा फटका काेणाला बसणार ? यावर आता शहरात चर्चा सुरु झाली आहे. यासर्व प्रश्नांची उत्तरे शनिवारी मतमाेजणीच्या दिवशी सकाळी अकरावाजेपर्यंत मिळतील. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांचा विचार करता, वडगांव शेरी, शिवाजीनगर, काेथरुड, खडकवासला, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टाेन्मेंट, कसबा या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी कसबा वगळता सात मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत.  यामध्ये पाच भाजपचे असुन, दाेन आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आहेत.

भाजपकडून सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकतील असा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात विचार करता  काेथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील यांची जागा सुरक्षित मानली जात आहे. त्यापाठाेपाठ पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, शिवाजीनगरचे सिध्दार्थ शिराेळे यांची जागा सुरक्षित मानली जात आहे. पर्वती आणि शिवाजीनगरमध्ये काॅंग्रेसमध्ये बंडखाेरी झाल्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकताे. पुणे कॅन्टाेन्मेंट मध्ये भाजपचे सुनील कांबळे यांच्यासमाेर काॅंग्रेसचे रमेश बागवे हे रिंगणात असुन, ही लढत चुरशीची हाेण्याची शक्यता आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेमुळे लढत तिरंगी झाली आहे. यामुळे काॅंग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने, मनसेचे गणेश भाेकरे यांच्यात लढत झाली आहे. या मतदारसंघात जेव्हा तिरंगी लढत हाेते, तेव्हा त्याचा फायदा हा भाजपला हाेताे असा अनुभव आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातही तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. या ठिकाणी मनसेचे मयुरेश वांजळे यांनी महायुतीचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि महाविकास आघाडीचे सचिन दाेडके यांच्यासमाेर आव्हान उभे केले आहे.

वडगांव शेरी आणि हडपसर या दाेन मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दाेन्ही मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस आहे. वडगांव शेरीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासमाेर शरद पवार यांनी बापू पठारे यांचे कडवे आव्हान उभे केले आहे. तर हडपसर मध्ये विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासमाेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रशांत जगताप  रिंगणात आले आहे. या दाेन्ही मतदारसंघात काेणती राष्ट्रवादी काॅंग्रेस बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis: राज्यात मतदानाचा टक्का वाढला; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या-ज्या वेळेस…”

 

चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.

राज्यात यंदा मंतदानची टक्केवारी वाढली आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मतदानाचा टक्का वाढला आहे, त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. ज्या-ज्या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढते, त्यावळेस भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

Web Title: Pune mahayuti and mva 8 constituency fight results on 23 november for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 02:04 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
4

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.