Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!

Gokul Chairman Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत चुयेकर निवडणूक लढवत आहेत.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 02:24 PM
Rajesh patil gokul election

Rajesh patil gokul election

Follow Us
Follow Us:
  • गोकुळच्या अध्यक्षपदासाठी राजेश पाटील विरुद्ध शशिकांत चुयेकर
  • महायुतीकडून राजेश पाटील यांना उमेदवारी
  • सतेज पाटील यांच्या आघाडीकडून शशिकांत चुयेकर मैदानात
 

Gokul Chairman Election 2026 : कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गोकुळ चौकाजवळ सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास गोकुळच्या नव्या अध्यक्षाचं नाव समोर येण्याची शक्यता आहे.

कोण आहेत राजेश पाटील?

राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या राजेश पाटील यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे देखील आमदार होते.

NCP Merger : विलिनीकरणाच्या चर्चेवरून मोठ्या घडामोडी! सुनील तटकरेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा खळबळ!

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील चंदगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादीसाठीही मोठा धक्का मानला गेला होता.

अजितदादांसाठी घेतला होता फेटा न बांधण्याचा निर्धार

राजेश पाटील यांच्या राजकीय प्रवासातील एक विशेष गोष्ट म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. अजितदादांप्रती असलेली त्यांची निष्ठा या विधानातून दिसून आली होती. 2024 मध्ये राजेश पाटील यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनीही कोल्हापूर दौऱ्यात फेटा बांधला नसल्याची चर्चा झाली होती.

जुन्या पराभवाचा वाद आता निवळणार?

गोकुळच्या मागील निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि संजय मंडलिक यांचे चिरंजीव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र, आता मुश्रीफ गटाकडूनच राजेश पाटील यांना गोकुळच्या अध्यक्षपदासाठी संधी मिळाल्याने जुन्या राजकीय मतभेदांवर पडदा पडल्याचं चित्र आहे.

आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील बाजी मारतात की शशिकांत चुयेकर बाजी पलटवतात, याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे.

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने कोणाला उमेदवारी दिली आहे?

    Ans: महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

  • Que: राजेश पाटील कोण आहेत आणि ते कधी आमदार झाले होते?

    Ans: राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2024 मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत चुयेकर यांना कोणत्या आघाडीने उमेदवारी दिली आहे?

    Ans: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांना गोकुळच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

Web Title: Gokul chairmen election 2026 rajesh patil shashikant chuyekar vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Gokul
  • Gokul Milk
  • kolhapur news
  • Mahayuti
  • Rajesh Patil
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?
1

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा
2

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

Gokul President Election 2026 : गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?
3

Gokul President Election 2026 : गोकुळच्या सत्तासंघर्षावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद; सिंघवी-रोहतगी आमनेसामने, कोर्टात काय घडलं?

Satej Patil: Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला
4

Satej Patil: Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.