Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Chairman Election 2026 : अजितदादांच्या राईट हॅन्डची ‘गोकुळ’ मध्ये बाजी! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड

Gokul Chairman Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली असून महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी बाजी मारली आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा पराभव झाला.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 03:02 PM
Rajesh patil

Rajesh patil

Follow Us
Follow Us:
  • गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली
  • राजेश पाटील गोकुळचे अध्यक्ष
  • गोकुळमध्ये महायुतीची बाजी
 

Gokul Chairman Election 2026 : कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा अखेर फैसला झाला आहे. महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या लढतीत राजेश पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे गोकुळच्या सत्तेवर महायुतीने विजय प्राप्त केला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली 10 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक पार पडली. गोकुळच्या 25 निवडून आलेल्या संचालकांसह चार शासननियुक्त संचालकांनीही मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीपासूनच या निवडणुकीत शासननियुक्त संचालकांच्या मतदानावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने 10 नोव्हेंबरला निवडणूक घेण्यास परवानगी दिली होती. अंतिम निकाल न्यायालयातील प्रकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहील, असेही निर्देश देण्यात आले होते.

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!

कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू नेते

राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे देखील आमदार होते. त्यामुळे राजेश पाटील यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाची अजित पवार यांनाही मोठी खंत होती.

अजितदादांनी म्हटलं होतं ‘माझा उजवा हात’

राजेश पाटील यांच्या विजयाची चर्चा होत असताना अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. चंदगडमधील एका कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राजेश पाटील यांचा उल्लेख आपला ‘उजवा हात’ असा केला होता.

‘कुठे फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय,’ अशा शब्दांत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त केली होती. ‘आमचा गड आला महाराष्ट्रात, पण आमचा सिंह गेला,’ असं म्हणत त्यांनी राजेश पाटील यांच्या पराभवाचं दुःखही बोलून दाखवलं होतं.

गोकुळच्या जुन्या राजकीय वादावर पडदा?

गोकुळच्या मागील निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, आता याच हसन मुश्रीफ यांच्या गटाकडून राजेश पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे जुन्या राजकीय मतभेदांवर पडदा पडल्याचं चित्र आहे.

दरम्यान, 13 विरुद्ध 12 अशा संचालकांच्या संख्याबळात शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानाचा मुद्दा निर्णायक ठरला. अखेर राजेश पाटील यांच्या विजयाने गोकुळच्या राजकारणात महायुतीने नवी खेळी यशस्वी केली आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौलाकडे जिल्ह्याचे लक्ष

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महायुतीचे उमेदवार राजेश नरसिंगराव पाटील यांची 10 नोव्हेंबर 2026 रोजी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

  • Que: गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्याविरोधात कोण होते?

    Ans: सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांनी राजेश पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

  • Que: अजित पवार यांनी राजेश पाटील यांच्याबाबत काय विधान केलं होतं?

    Ans: अजित पवार यांनी राजेश पाटील यांचा उल्लेख आपला 'उजवा हात' असा केला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी 'आमचा गड आला महाराष्ट्रात, पण आमचा सिंह गेला' अशी भावना व्यक्त केली होती.

Web Title: Gokul chairmen election 2026 gokul new chairmen rajesh patil vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Gokul
  • Gokul Milk
  • Mahayuti
  • Rajesh Patil
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!
1

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?
2

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!
3

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
4

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.