Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका!’त्या’ कारवाईवरील स्थगिती उठवली

 पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका कथित मनमानी कारवाईला उच्च न्यायालयानकडून झटका देण्यात आला आहे. नामांकित "2BHK डायनर अँड की क्लब"चा मद्यपरवाना निलंबित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 09, 2026 | 07:25 PM
The Pune State Excise Department receives a jolt from the High Court! The stay on 'that' action has been lifted.

The Pune State Excise Department receives a jolt from the High Court! The stay on 'that' action has been lifted.

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका कथित मनमानी कारवाईला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. शहरातील नामांकित “2BHK डायनर अँड की क्लब”चा मद्यपरवाना निलंबित करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. इतकंच नाही तर तात्काळ सील हटवून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देखील दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षी (दि. १५ ऑगस्ट) शहरातील एकूण आठ पबवर नियम आणि वेळेनंतर पब सुरू ठेवून तसेच मद्यविक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईनंतर अ-निमियतेचा ठपका ठेवत दोन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने 2BHK डायनर अँड की क्लबवर कारवाई करत त्यांचा १५ दिवसासाठी परवाना रद्दकरून पबला सील ठोकले होते.

हेही वाचा : RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी

दरम्यान मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने इतर त्या आठ पबवर कारवाई केली नव्हती. यामुळे देखील या करवाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यापबला अभय कोणाचे असाही प्रश्न विचारला जात होता. आता न्यायालयाच्या निकालानंतर मात्र आणखीनच राज्य उत्पादन शुल्क विभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत.

दरम्यान या कारवाई विरोधात क्लबचे प्रमुख डॉ. हेरंब शेलके यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयात त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रल्हाद परांजपे यांनी जोरदार युक्तिवाद केला. उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ही एकतर्फी, अविचारी आणि उच्चहस्तेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने याची दखल घेत, १५ दिवसांसाठी लावण्यात आलेला मद्यपरवाना निलंबनाचा आदेश स्थगित केला.

या आदेशामुळे 2BHK डायनर अँड की क्लब पुन्हा एकदा तात्काळ सुरू होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे “कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणतीही यंत्रणा कायद्यापेक्षा मोठी नाही” हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला आहे.

हेही वाचा : WPL 2026: पहिल्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा झटका! ‘ही’ स्टार अष्टपैलू खेळाडू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार…

हा निर्णय केवळ एका आस्थापनापुरता मर्यादित न राहता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदारी, पारदर्शकता आणि अधिकारांच्या मर्यादा यावरही बोट ठेवणारा ठरला आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांबाबत प्रशासनाला अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. याप्रकरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया ब्रँड ओनर डॉ. हेरंब शेलके यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Pune news the high court has stayed the order to suspend the liquor license of 2bhk diner and key club

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 07:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.