WPL 2026 मध्ये पूजा वस्त्रकर काही सामन्यांना मुकणार (फोटो-सोशल मीडिया)
Pooja Vastrakar will miss some matches in WPL 2026 : महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. आज या हंगामातील पहिला सामना 9 जानेवारी रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि 2024 चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मागील हंगामात आरसीबीची कामागिरी निराशाजनक राहिली होती. परंतु, अशातच 2026 मधील हंगाम होण्यापूर्वीच आरसीबीला मोठा झटका बसला आहे. संघाची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकर सुरुवातीच्या काही सामन्यात खेळताना दिसणार नाही.
हेही वाचा : धक्कादायक! रणजी क्रिकेटपटूचे सामन्यादरम्यान मैदानात कोसळून निधन! BCCI कडून शोक व्यक्त
आरसीबीची सदस्य पूजा वस्त्रकर पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध असणार आहे. पूजा अजून देखील पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही. ती अनफिट असून बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तिच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. आरसीबी पहिल्या सामन्यात विजयाकडे लक्ष केंद्रित देत असताना, पहिल्याच सामन्यापूर्वी प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
आरसीबी प्रशिक्षक काय म्हणाले?
पूजा वस्त्राकरच्या तंदुरुस्तीबाबत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक मलोलन रंगराजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलोलन रंगराजन म्हणाले की, तिच्या पुनर्वसनात काही अडचणी आल्या असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिला डिस्चार्ज दिला जाणार होता. खांद्याच्या दुखापतीमुळे ती पुनर्वसनासाठी तिथे गेली असताना तिला बरे होण्यासाठी आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. तिला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. आम्हाला आशा आहे की ती लवकरच संघात सामीलन होणार. वृत्तानुसार, पूजा पुढील आठवड्यानंतर संघात सामील होणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पूजा वस्त्राकरची क्रिकेट कारकीर्द
२०२६ च्या आयपीएल लिलावामध्ये भारताची स्टार अष्टपैलू पूजा वस्त्राकरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८५ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे.पूजा ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज असून तिने भारतीय संघासाठी ७२ टी-२० सामन्यांमध्ये ५८ बळी टिपले आहेत. दुखापतीमुळे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सध्या संघाबाहेर आहे. पूजा वस्त्राकर यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून मैदानात खेळताना दिसली होती. एमआयसाठी १६ सामन्यांमध्ये तिने १२६ धावा फटकावल्या होत्या. तसेच तिने ७ बळी घेतले आहेत. पूजा वस्त्राकर एक प्रभावी गोलंदाज असून तिच्या समावेशामुळे आरसीबीची गोलंदाजी नक्कीच मजबूत होणार आहे. हंगामाच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये तिची गैरहजेरी संघासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.






