
PUNE NEWS: The Amrit Senior Citizen scheme receives an overwhelming response; 34 lakh senior citizens traveled using the scheme in a year.
चंद्रकांत कांबळे/पुणे : अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे.ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळतो.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) या योजनेसाठी ५८५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यावे लागते, ज्यामुळे वर्षभर प्रवास मोफत करता येतो.
हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस मधून प्रवास मोफत करता येतो. या योजनेतून पुणे एसटी विभागाला ५४ करोड ७१ लाख ८५ हजार ४६१ रूपये उत्पन्न मिळाले आहे.ही रक्कम महाराष्ट्र शासनाकडून एसटी विभागाला दिली जाते.अमृत ज्येष्ठ योजनेचा पुणे विभागातील ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे.
महिना लाभार्थी उत्पन्न
हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : ऑरेंज सिटीमध्ये स्फोटक अर्धशतकाचा ‘अभिषेक’; जामठा स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षावरील नागरिकांनी एसटीने प्रवास करूण पुणे एसटी विभागाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.जास्तीत जास्त ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अरुण सिया, विभाग नियंत्रक,पुणे