अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज २१ जानेवारी रोजी नागपुर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताकडून स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक अर्धसटक झळकवले आहे. त्याने २२ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे.
हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार
नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारताला प्रथमक फलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामीवीरांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. ७ चेंडूत १० धावा करून संजू माघारी गेला. त्यानंतर दीर्घ काळानंतर संघात परतलेला ईशान किशन मैदानात आला, परंतु तो देखील काही खास करू शकला नाही. ५ चेंडूत ८ धावा करून तो बाद झाला. एका बाजून विकेट्स पडत होत्या, तर दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत होता. त्याने २२ चेंडूत आपले ७ वे टी२० अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने, ४ चौकार आणि ४ षटकार लगावले.दुसरीकडून त्याला सूर्यकुमार यादव साथ देत होता. परंतु, कर्णधार सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ३२ धाव करून बाद झाला. अभिषेक ३२ चेंडूत ७७ धावांवर खेळत आहे तर हार्दिक पंड्या ४धावांवर खेळत आहे. भारताच्या ३ बाद १४० धावा झाल्या आहेत.
A fiery FIFTY 🔥 7⃣th in T20Is for Abhishek Sharma 👏 He is looking in great touch tonight 👌 Updates ▶️ https://t.co/ItzV352h5X#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sKBaApHjtp — BCCI (@BCCI) January 21, 2026
हेही वाचा : WPL 2026 : दिल्लीच्या फलंदाजाला पंचांशी वाद भोवला! ‘या’ खेळाडूला ठोठावण्यात आली मोठ्या दंडासह शिक्षा
न्यूझीलंड संघ: टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, ईश सोढी, जेकब डफी
भारत संघ : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह






