Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात मोठी डेटा चोरी; मालमत्ताकराचा डेटा विकला पाच हजारांत; सल्लागार अभियंत्यावर गुन्हा दाखल

यासीर अन्सारी हा मे. पोलस्टार कन्सल्टिंग कंपनीमार्फत महापालिकेत कार्यरत होता. ९ जून रोजी कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व्हर रूममधील काही फाईल्स ॲक्सेस होत नसल्याचे निदर्शनास आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2026 | 03:08 PM
पुणेकरांचा मालमत्ता कराचा डेटा विकला पाच हजारांत; सल्लागार अभियंत्यावर गुन्हा दाखल

पुणेकरांचा मालमत्ता कराचा डेटा विकला पाच हजारांत; सल्लागार अभियंत्यावर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, पुणेकरांच्या मालमत्ता कराची महत्त्वपूर्ण माहिती असलेली हार्ड डिस्क चोरून अवघ्या ५ हजार रुपयांसाठी विकला आहे. पुणे महापालिका मुख्यालयातून ही चोरी झाली आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेतील एका अभियंत्याने ही हार्ड डिस्क चोरून फॉरमॅट केल्यानंतर विकल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या डेटा सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी प्रदीप रासाळ (वय ५८) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानुसार यासीर अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यासीर अन्सारी हा मे. पोलस्टार कन्सल्टिंग कंपनीमार्फत महापालिकेत कार्यरत होता. ९ जून रोजी कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व्हर रूममधील काही फाईल्स ॲक्सेस होत नसल्याचे निदर्शनास आले. नंतर सर्व्हर रूमची तपासणी केली असता महत्त्वाची हार्ड डिस्क गायब असल्याचे आढळून आले.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर यासीर अन्सारी याने हार्ड डिस्क चोरल्याचे स्पष्ट झाले. महापालिका अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हार्ड डिस्क परत आणून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुढील तपासात त्याने हार्ड डिस्क फॉरमॅट करून केवळ ५ हजार रुपयांत विकल्याचे उघड झाले. नागरिकांकडून मालमत्ता करासंदर्भात तक्रार, पडताळणी किंवा कागदपत्रांच्या प्रतींची मागणी झाल्यास ही माहिती हार्ड डिस्कमधून काढून उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे या हार्ड डिस्कमधील माहिती अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची मानली जाते.

सानपाडा रेल्वेस्टेशन फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायम; बीएमसीच्या कारवाईनंतरही पुन्हा उभे राहतात अनधिकृत हॉटेल्स आणि दुकाने

हार्ड डिस्क करण्यात आली फॉरमॅट

ज्या कक्षातून हार्ड डिस्क चोरीस गेली त्या ठिकाणी मर्यादित अधिकाऱ्यांनाच प्रवेश होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. वारंवार संपर्क साधून आणि सीसीटीव्ही चित्रफीत दाखवल्यानंतर अखेर चोरीची हार्ड डिस्क परत मिळविण्यात महापालिकेला यश आले. मात्र, हार्ड डिस्क फॉरमॅट करण्यात आल्याने त्यातील माहिती नष्ट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या हार्ड डिस्क डेटा रिकव्हरीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली असून, माहिती पुन्हा प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तीनपैकी एक हार्ड डिस्क चोरीला

मालमत्ता कर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी सांगितले की, चोरीस गेलेल्या हार्ड डिस्कमध्ये चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर संकलनाशी संबंधित महत्त्वाची माहिती संग्रहित होती. मालमत्ता कराची कागदपत्रे स्कॅन करून तीन स्वतंत्र हार्ड डिस्कमध्ये जतन करण्यात आली होती. त्यापैकी ही एक हार्ड डिस्क चोरीस गेली होती.

Web Title: Pune residents property tax data sold for 5000 case registered against consulting engineer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Imperial Data
  • Pune Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.