Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: दिवाळीत RTO ची नियमभंग करणाऱ्या १९८ बसवर धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा जास्त…

यंदा पुणे आरटीओने आगाऊ पाऊल उचलत खासगी बस संघटनांची बैठक घेऊन प्रवाशांची गैरसोय आणि लूट थांबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2025 | 02:56 PM
Pune News: दिवाळीत RTO ची नियमभंग करणाऱ्या १९८ बसवर धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा जास्त…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे आरटीओची 198 बसवर धडक कारवाई
आरटीओने ई-चलनाच्या माध्यमातून केली कारवाई
17 लाखांपेक्षा जास्त रकमेची केली गेली कारवाई

चंद्रकांत कांबळे/पुणे: दिवाळी काळात खासगी बस वाहतूकदारांनी एसटी महामंडळाच्या कमाल भाडेदराच्या दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारत असेल तर प्रादेशिक परिवहन विभागात तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर दि. १३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान व्हॉट्सअॅप व ईमेलच्या माध्यमातून एकूण ५३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी फक्त दोन तक्रारी भाडेवाढीसंदर्भातील असून, उर्वरित तक्रारी विविध नियमभंगासंबंधीत आहेत.दि. ०१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान विविध प्रकारचे वाहतूकीचे नियम मोडल्यामुळे १९८ खासगी बसवर ई-चलनाच्या माध्यमातून आरटीओकडून दंडात्मक कारवाई करत एकूण १७ लाख ६५ हजार ४५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

प्रवाशांकडून आलेल्या ५३ तक्रारींपैकी केवळ दोन प्रवाशांनी सर्व आवश्यक माहितींसह नाव, मोबाईल क्रमांक, तिकिटाचा फोटो व वाहन क्रमांक व्यवस्थित तक्रार दाखल केली आहे. मात्र, उर्वरित ५१ तक्रारींमध्ये अशी कोणतीही माहिती अथवा पुरावा जोडले नसल्याने संबंधितांवर कारवाई करणे परिवहन विभागासमोर आव्हान ठरत आहे.

ई-चलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली कारवाई

सीटबेल्ट वापर न करणे – १९

अतिरिक्त प्रवासी – ०१

वाहनात माल वाहतूक – २३

आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग अडवणे – ०७

आग विझविण्याचे यंत्र नसणे – १८

चौकट

ई-चलनाद्वारे आकारलेला दंड:

एकूण बसची संख्या – १९८

वसूल दंड – ११,७४,९५०

प्रलंबित दंड – ५,९०,५००

एकूण दंडरक्कम – १७,६५,४५०

तक्रार करण्यासाठी देण्यात आला होता नंबर 

दरवर्षीप्रमाणे वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्याच्या तक्रारी आरटीओकडे येतात. त्यामुळे यंदा पुणे आरटीओने आगाऊ पाऊल उचलत खासगी बस संघटनांची बैठक घेऊन प्रवाशांची गैरसोय आणि लूट थांबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तसेच प्रवाशांनी जादा भाडेदर आकारणीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले होते.

पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

प्रवाशांची काही तक्रार असल्यास त्यासाठी आम्ही व्हॉट्सअॅप क्रमांक आणि ई-मेलची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जादा भाडे आकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे तसेच इतर तक्रारी असल्यास त्या पुराव्यांसह पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. ज्या प्रवाशांनी अपूर्ण माहिती पाठवली आहे, त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेतल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

स्वप्निल भोसले,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे

Web Title: Pune rto take action against 198 buses who brake the rules in diwali 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • RTO

संबंधित बातम्या

PUNE NEWS : पुणेकरांसाठी चिंतेची बाब! यंदाची दिवाळी ‘कानठळ्या’ बसवणारी; शहरातील ‘आवाजा’ची पातळीत वाढ 
1

PUNE NEWS : पुणेकरांसाठी चिंतेची बाब! यंदाची दिवाळी ‘कानठळ्या’ बसवणारी; शहरातील ‘आवाजा’ची पातळीत वाढ 

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती
2

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Ahilyanagar : ‘एक पणती जवानांसाठी’ अहिल्यानगरात आजी माजी सैनिक आणि नागरिकांचा स्तुत्य उपक्रम
3

Ahilyanagar : ‘एक पणती जवानांसाठी’ अहिल्यानगरात आजी माजी सैनिक आणि नागरिकांचा स्तुत्य उपक्रम

जगभरात पोहोचला पुणेरी फराळ! जपानला सर्वाधिक पार्सलची नोंद; टपाल विभागाला लाखोंचा महसूल
4

जगभरात पोहोचला पुणेरी फराळ! जपानला सर्वाधिक पार्सलची नोंद; टपाल विभागाला लाखोंचा महसूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.