Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSRP नंबर प्लेटबसवण्यात ‘हा’ राज्यात अव्वल; RTO ने दिलेल्या माहितीनुसार…

अन्यथा याबाबतची मोहीम परिवहन विभागाकडून अधिक गतिमान केली जाणार असून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 02:05 PM
HSRP नंबर प्लेटबसवण्यात ‘हा’ राज्यात अव्वल; RTO ने दिलेल्या माहितीनुसार…
Follow Us
Follow Us:

एचएसआरपी बसविण्यात रत्नागिरी जिल्हा अव्वल
जिल्ह्यातील ७५ टक्के काम पूर्ण
नंबर प्लेटसाठी त्वरीत बुकिंग करण्याचे आवाहन

रत्नागिरी: एच.एस.आर.पी. अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचा मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील ७५ टक्के वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर एच.एस.आर.पी. बसवून घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या या धावला कामगिरीबद्दल राज्य परिवहन आयुक्तांनी अभिनंदन केले आहे. रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १,३७,५७१ वाहनधारकाने आपल्या वाहनांवर एच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसवून घेतली आहे.

तसेच या नंबर प्लेटसाठी १४.३६४ जणांनी बुकिंग केले आहे. जिल्ह्यातील वाहनांच्या एकूण एच.एस.आर.पी. उद्दिष्ट पैकी ७५ टक्के उद्दिष्ट यामुळे पूर्ण झाले आहे, मात्र उर्वरित २५ टक्के वाहनांवर यासारख्या नंबर प्लेट अजून बसलेल्या नाहीत. त्यामुळे या वाहनांवरती आता दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यांनी अद्याप अशा आधुनिक नंबर प्लेट बसविलेल्या नाही त्यांनी तातडीने या नंबर प्लेटसाठी बुकिंग करणे आवश्यक आहे.

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

अन्यथा याबाबतची मोहीम परिवहन विभागाकडून अधिक गतिमान केली जाणार असून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. ही कारवाई टाळण्यासाठी एच.एस.आर.पी. नंबर प्लेटसाठी त्वरीत बुकिंग करून कारवाई टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक कार्यालयाकडून केले आहे.

आरटीओ काय करणार?

राज्य परिवहन विभागाला आतापर्यंत एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी जवळपास १ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) तसेच उर्वरित राज्यात ७३ लाखांहून अधिक वाहनांवर नवीन विशेष नोंदणी प्लेट बसवण्यात आल्या आहेत. उर्वरित २७ लाख वाहनांवर मुदत संपल्यानंतरही एचएसआरपी बसवलेले नाही. येत्या काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

HSRP नंबर प्लेटसाठी चार वेळा मुदतवाढ; मात्र अद्याप 27 लाख वाहने…, आरटीओ काय करणार?

एचएसआरपी बसवण्याची पहिली अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ होती. त्यानंतर चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि शेवटची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली. यापुढे मुदतवाढ दिली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नसल्याने, नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओकडून लवकरच कारवाई सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ratnagiri district first in maharashtra at hsrp number plate rto news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • HSRP
  • HSRP Plate
  • ratnagiri news
  • RTO

संबंधित बातम्या

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक
1

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी
2

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
3

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.