Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले

यंदा सुरुवातीला पाऊस वेळेवर न झाल्याने पेरणी केलेल्या भाताचे बियाणे विरळ उगवले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोपे तयार होण्यापूर्वीच नुकसान झाले. कसेबसे रोपे तयार करून भात लागवड केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2026 | 03:48 PM
आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले

आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने भातशेतीचे कंबरडे मोडले

Follow Us
Follow Us:

रांजणी : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण आणि आहुपे या भातशेतीच्या भागात यंदा पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. भात लागवडीपूर्वी आणि लागवडीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक भात खाचरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. काही ठिकाणी लागवड केलेली भात रोपे पाण्याखाली गाडली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदाच्या भात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण ६३८०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यापैकी सुमारे ५१०० हेक्टर क्षेत्र आंबेगाव तालुक्यात भात लागवडीखाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळात शुभमुहूर्त मानून धुळवाफेत भाताची पेरणी केली. मात्र, रोहिणी व मृग नक्षत्रानंतर आद्रा नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने उर्वरित क्षेत्रावर लागवड करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

‘हवा तेव्हा नाही, नको तेव्हा मुसळधार’

यंदा पेरणीच्या काळात पावसाने दिलेली हुलकावणी आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसला आहे. सुरुवातीला पावसाअभावी बियाण्यांची उगवण विरळ झाली, तर नंतरच्या मुसळधार पावसाने तयार झालेली रोपे आणि लागवड केलेले पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ‘पाऊस हवा तेव्हा नाही आणि नको तेव्हा मुसळधार’ अशी अवस्था झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

भाताचे उत्पादन घटण्याची भीती

यंदा सुरुवातीला पाऊस वेळेवर न झाल्याने पेरणी केलेल्या भाताचे बियाणे विरळ उगवले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोपे तयार होण्यापूर्वीच नुकसान झाले. कसेबसे रोपे तयार करून भात लागवड केली; मात्र, आता पुन्हा जोरदार पावसामुळे भातखाचरांत पाणी साचून रोपे गाडली जात आहेत. यामुळे यंदा भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती आहे. शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असे भात उत्पादक शेतकरी सिताराम कुडेकर म्हणाले.

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी

Web Title: Rain has crippled the paddy crop in the western tribal region of ambegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Ambegaon taluka
  • Heavy Rain

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.