Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

शरद पवार गटातील नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2026 | 02:24 PM
शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Follow Us
Follow Us:
  • मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले
  • शरद पवार गटाकडून नगरपरिषद कारभारावर गंभीर आरोप
  • सत्ताधाऱ्यांविरोधात न्यायालयीन लढाईचा इशारा
न्हावरे/योगेश मारणे : शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, सत्तासंघर्षाने टोक गाठले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांच्या गठबंधनाला उद्योगपती प्रकाश धारिवाल आणि माजी आमदार, ॲड.अशोक पवार यांची संमती असतानाही केवळ अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. या घडामोडीनंतर शरद पवार गटातील नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले असून, त्यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

 

शिरूर शहराच्या राजकारणात प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांचे वर्चस्व आणि राजकीय प्रभाव नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने शरद पवार गटाला दिलेला राजकीय धक्का हा अप्रत्यक्षपणे प्रकाश धारीवाल यांच्या प्रभावाला आव्हान देण्याची खेळी असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

मितेश गादिया यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नगरसेवक तथा गटनेते रवींद्र ढोबळे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत नगरपरिषदेच्या कारभाराचा पंचनामा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, रवींद्र ढोबळे, मितेश गादिया, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सुनीता पोटे, स्वप्नाली जामदार, चारुशीला कोळपकर, अमोल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुनीता पोटे यांनी पाणीपुरवठा निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप केला. तसेच  नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे केली जात असून, पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाच विविध कामांची कंत्राटे दिली जात असल्याचा दावाही पोटे यांनी  केला. गटनेते रवींद्र ढोबळे यांनी तर शिरूर नगरपरिषदेचे कामकाज वाघोलीतून नियंत्रित होत असून, नगरपालिकेचा सर्व कारभार आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षांचे पती हेच करीत आहेत. अशी टीका करत सध्या नगरपालिकेत ‘वाघोली पॅटर्न’ सुरू असल्याचा टोला ढोबळे यांनी लगावला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गठबंधन असताना, मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार केल्यामुळे वेळप्रसंगी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही ढोबळे यांनी दिला. मितेश गादिया, स्वप्नाली जामदार, चारुशीला कोळपकर आणि अमोल चव्हाण या नगरसेवकांनी विकासकामांमध्ये नगराध्यक्षांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा : नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या युतीतून नगरपरिषदेत ‘पाचर्णे ‘ समीकरण उदयास आले असले, तरी या सत्तेला शरद पवार गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योगपती प्रकाश धारीवाल आणि माजी आमदार ॲड.अशोक पवार यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष हा केवळ पदांचा राहिला नसून शिरूरच्या राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झाला आहे. त्यामुळे आगामी काळात कोणाची राजकीय खेळी यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदावरून कोणाला पायउतार व्हावे लागले?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

  • Que: शरद पवार गटाने नगरपरिषदेच्या कारभारावर कोणते आरोप केले?

    Ans: पाणीपुरवठा निधीत अनियमितता, नगरसेवकांना विश्वासात न घेणे आणि पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना कंत्राटे दिल्याचे आरोप करण्यात आले.

  • Que: शरद पवार गटाने सत्ताधाऱ्यांना कोणता इशारा दिला?

    Ans: मितेश गादिया यांना पदावरून हटवल्याप्रकरणी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून गरज पडल्यास न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला.

Web Title: Sharad pawars nationalist congress party has leveled allegations regarding the functioning of the shirur nagarparishad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • MP Sharad pawar
  • Shirur News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.