Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

Ganeshotsav: श्रीकृष्ण मंडळाचा चॉकलेटचा बंगला पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली असून, हा देखावा पाहण्यासाठी तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 02:35 AM
पुणे गणेशोत्सव

पुणे गणेशोत्सव

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर
  • ‘चॉकलेटचा बंगला’ अन् हलत्या देखाव्यांची धूम
  • श्रीकृष्ण मंडळाने उभारला ‘चॉकलेटचा बंगला’ 
Pune Ganeshotsav 2026: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला… हे लोकप्रिय बालगीत ऐकताना लहान मुलांच्या कल्पनेत उभा राहणारा चॉकलेटचा बंगला यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. गणेशोत्सवामध्ये केवळ धार्मिक विषयांवरील किंवा भव्यदिव्य देखावेच नव्हे, तर लहान मुलांचे बालविश्व आणि आवडीनिवडी केंद्रस्थानी ठेवून साकारलेले देखावे पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

डेक्कनमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंडळाने उभारलेला ‘चॉकलेटचा बंगला’ आणि शहरांतील विविध मंडळांनी पंचतंत्र तसेच इसापनीतीतील बोधकथांवर आधारित साकारलेले हलते देखावे बालचमूंसाठी यंदाचे मुख्य आकर्षण ठरले आहेत.

श्रीकृष्ण मंडळाचा चॉकलेटचा बंगला पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली असून, हा देखावा पाहण्यासाठी तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत आहेत. देखाव्यात चॉकलेटी रंगाच्या भिंती उभारून त्याला सुंदर बंगल्याचे रूप देण्यात आले आहे. या बंगल्याच्या आत आईस्क्रीम आणि टॉफींची अत्यंत आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

त्यामुळे देखावा पाहताना आपण थेट काल्पनिक चॉकलेटच्या दुनियेतच पोहोचलो असल्याचा अद्भुत आनंद चिमुकल्यांना मिळत आहे. बालपणी चॉकलेटचा बंगला प्रत्यक्षात पाहण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असल्याने मोठ्यांमध्येही या देखाव्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी मंडळाकडून फुगे उडवले जात असून प्रत्यक्ष चॉकलेटचे वाटपही केले जात आहे.

दुसऱ्या बाजूला, मुलांवर नकळत संस्कार करणाऱ्या आणि मनोरंजन करणाऱ्या पौराणिक तसेच नैतिक कथाही देखाव्यांच्या माध्यमातून जिवंत झाल्या आहेत. हत्ती गणपती मंडळाने पंचतंत्रातील प्रसिद्ध ‘माकड आणि मगर’ ही बोधकथा हलत्या देखाव्याद्वारे अतिशय रंजक पद्धतीने मांडली आहे. कसबा पेठेतील उदय मित्र मंडळाने लहान मुलांच्या उत्सुकतेला खतपाणी घालणारा ‘भयावह जंगल’ या संकल्पनेवर आधारित थरारक देखावा उभारला आहे.

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

चित्रपट किंवा डिजिटल पडद्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष पात्रांच्या माध्यमातून बोधकथा आणि काल्पनिक दुनिया पाहता येत असल्याने मुलांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांमध्ये लहान मुलांचा मोठा सहभाग असल्याने, बालमनाला भुरळ घालणारे हे देखावे यंदाच्या उत्सवात सर्वाधिक गर्दी खेचणारे ठरत आहेत.

Web Title: Shrikrushn mandal built choclate bunglow theme in pune ganesh festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Chocolate
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

Ganeshotsav 2026: बाप्पाचा मोदक झाला ‘गॉरमेट’! बिस्कॉफ, कुनाफा ते हॅझलनट; यंदा तुमच्या मोदकात काय आहे?
2

Ganeshotsav 2026: बाप्पाचा मोदक झाला ‘गॉरमेट’! बिस्कॉफ, कुनाफा ते हॅझलनट; यंदा तुमच्या मोदकात काय आहे?

Ganpati Festival 2026: चिमुकल्यांचा भन्नाट ‘बाल्या डान्स’! गणरायासमोर धरला ठेका, खेडमधील VIDEO व्हायरल
3

Ganpati Festival 2026: चिमुकल्यांचा भन्नाट ‘बाल्या डान्स’! गणरायासमोर धरला ठेका, खेडमधील VIDEO व्हायरल

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!
4

Lalbaugcha Raja च्या भक्तांच्या सेवेसाठी Combiflam MS Cream; भाविकांसाठी मोफत लेग मसाज सुविधा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.