
गाळ हटणार अन् पाणीसाठा वाढणार; आळेतील बंधाऱ्याच्या खोलीकरणाला सुरुवात
पाणी अडवण्याची क्षमता वाढल्याने पावसाळ्यानंतरही अधिक काळ पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होणार आहे.तसेच पाण्याचा जमिनीत होणारा मुरवा वाढल्याने भूजल पातळीत सुधारणा होऊन विहिरी व बोअरवेलच्या पाण्यालाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. कामाच्या प्रारंभी प्रकल्प अभियंता संदेश पाटील यांनी जलसंधारण,पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याबाबत माहिती दिली. प्रकल्प व्यवस्थापक दिग्विजय शर्मा यांनी जलसंधारणाची कामे केवळ बांधकामापुरती मर्यादित न ठेवता त्याचा शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
समुदाय मोबिलायझर तुषार कुठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी आळेगावचे माजी सरपंच मुकुंद भंडलकर, माजी उपसरपंच मंगेश कुऱ्हाडे, तलाठी मुंगळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र कुऱ्हाडे, गणेश अप्पा शिंदे, संतोष शिंदे, गोविंद शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बंधाऱ्याची खोली वाढल्याने‘अडवा, जिरवा आणि साठवा’ या जलसंधारणाच्या उद्दिष्टाला प्रत्यक्ष बळ मिळणार असून, आगामी काळात परिसरातील शेतीसाठी हा जलसाठा महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा आहे.
FAQ
1. आळे येथे कोणते काम सुरू करण्यात आले आहे?
जलसंधारणाच्या कामांतर्गत सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढून त्याची खोली वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
2. हे काम कुठे सुरू आहे?
आळे येथील उकळीचा महादेव मंदिराजवळील सिमेंट बंधाऱ्यात हे काम सुरू आहे.
3. या कामाचा मुख्य उद्देश काय आहे?
पावसाचे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग करणे हा या कामाचा उद्देश आहे.