Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड तालुक्यात मान्सूनच्या हुलकावणीने पेरणी, लागवडी रखडल्या; शेतकरी चिंतेत

ऊसाची लागवड करणारे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी केंद्रातून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली, तरी पाऊस नसल्याने ते पडून आहेत. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2026 | 01:38 PM
दौंड तालुक्यात मान्सूनची हुलकावणी, बळीराजा चिंतेत; पेरणी, लागवडी रखडल्या

दौंड तालुक्यात मान्सूनची हुलकावणी, बळीराजा चिंतेत; पेरणी, लागवडी रखडल्या

Follow Us
Follow Us:

पाटस : मान्सूनने हुलकावणी दिल्याने दौंड तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या व लागवडी रखडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून ठेवली असली, तरी पावसाअभावी बियाणे टाकण्याचे धाडस होत नाही.

तालुक्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र, जून महिना संपत आला तरी मान्सून पावसानं अद्याप हजेरी लावली नाही. आकाशात ढगाळ वातावरण तयार होते. मात्र, पाऊस पडत नसल्याने मान्सून एकप्रकारे हुलकावणी देत आहे. तालुक्यातील पाटस वरवंड, कुसेगाव, पडवी कानगाव तसेच इतर भागात पुरेसा प्रमाणात पाऊस झाला नाही. परिणामी, खरीप हंगामासाठी सोयाबीन, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी केली जाते. मात्र, पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या लांबणीवर टाकल्या आहेत. ज्यांनी घाई करून पेरणी केली, त्यांच्या शेतात उगवण होत नसल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

ऊसाची लागवड करणारे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी केंद्रातून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली, तरी पाऊस नसल्याने ते पडून आहेत. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

बळीराजा हवालदिल

“मशागत करून महिना झाला, पण पावसाचा पत्ता नाही. पेरणी केली तर बियाणे वाया जाईल, नाही केली तर वेळ निघून जाईल,” अशी व्यथा पाटस परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजही चुकत असल्याने शेतकरी संभ्रमात आहे. पावसाअभावी पेरण्या रखडल्याने खरिपाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. वेळेत चांगला पाऊस झाल्यासच बळीराजाला दिलासा मिळणार आहे.

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा

पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी हवामानातील बदलामुळे विदर्भात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. तर दुसरीकडे भू-गर्भातील आणि जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. विदर्भात ऐरवी १८ जूनपर्यंत ७९.०२ मिमी पाऊस पडतो. तर यंदा १८ जूनपर्यंत केवळ १९.०७ मिमी पाऊस विदर्भात झाला. त्यामुळे १८ जूनपर्यंत विदर्भात तब्बल ५९.९५ मिमी पावसाची तूट असल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणात पुढे आले आहे.

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार

Web Title: Sowing and planting operations stalled in daund taluka due to the monsoon playing truant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Patas News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.