Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांचा तब्बल ४०० मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 09, 2026 | 04:14 PM
सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण 'सक्रिय'; विलास लवंडेंचा निशाणा

सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण 'सक्रिय'; विलास लवंडेंचा निशाणा

Follow Us
Close
Follow Us:
  • पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला
  • सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय
  • नाकालानंतर परिसरात मोठा उत्साह
चाकण : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पाईट–आंबेठाण जिल्हा परिषद गटात झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणूक लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांचा तब्बल ४०० मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकला आहे.

 

या गटातून यापूर्वी सलग तीन वेळा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे निवडून आले होते. चौथ्यांदा त्यांच्या पत्नी सुनीता शरद बुट्टे पाटील यांची निवड झाल्याने या गटातील बुट्टे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आंबेठाण पंचायत समिती गणातून श्रद्धा मांडेकर यांनी अत्यंत चुरशीच्या व थरारक लढतीत अवघ्या १६ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अखेरच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट झाल्याने परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला.

या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.

विजयानंतर सुनीता बुट्टे पाटील व श्रद्धा मांडेकर यांनी मतदारांचे आभार मानत, परिसरातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निकालामुळे पाईट–आंबेठाण परिसरातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी काळात या भागातील विकासाच्या दृष्टीने या विजयाकडे महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

हे सुद्धा वाचा : वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाचा पराभव

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय नेत्यांची झोप उडवली आहे. परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रमुख भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाला पूर्णपणे नाकारल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या वरपुडकर कुटुंबासाठी ही निवडणूक एका मोठ्या राजकीय झटकाच मानली जात आहे. याचे कारण म्हणजे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांपैकी चार जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Web Title: Sunita sharad butte patil has won a resounding victory in the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Election News
  • Election Result
  • ZP Election

संबंधित बातम्या

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान
1

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.