पुणे शहरात दहशत कायम! पाच महिन्यात ६ तर, वर्षभरात २१ गोळीबाराच्या घटना
शांतता प्रिय शहरात कोयत्याचा दहशतीनंतर आता ‘ढिशक्यांव-ढिशक्यांव’ची दहशत माजू लागली असून, किरकोळ आणि मनात भिती बसविण्यासाठी देखील गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या आहेत. शहरात सलग गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर या गोळीबारांची दाहकता लक्षात येऊ लागली आहे. गेल्या पाच महिन्यात शहरात गोळीबाराच्या ६ घटना घडल्या असून, जीवे ठार मारण्यापेक्षा दहशतीसाठी गोळ्या झाडल्या जात असल्याचेही प्रकार्षाने जानवू लागले असल्याचे पोलिसांचे मत आहे.
पुण्यासारखे शांतता प्रिय शहराची गेल्या काही वर्षात गुन्हेगारी घटनांनी शांतता भंग केली आहे. लाठ्या काठ्यांच्या हाणामारी ते पिस्तूलांचा वापरापर्यंत गेलेली गुन्हेगारी आता दिवसागणीक भयावह रूप धारणकरू लागली आहे. कोयत्याची दहशत मना-मनात निर्माण झालेली असतानाच आता गोळ्यांचा ढिशक्यांव-ढिशक्यांव आवाज देखील मनात भिती निर्माण करू लागला आहे. उपनगरांपासून पुण्याच्या मध्यभागापर्यंत हे आवाज निघू लागले आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेना (शिंदे गट) युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. नंतर आता किरकोळ कारणावरून पुण्याच्या पेठेत गोळीबाराची घटना मध्यरात्री घडली. दोन्ही घटना या केवळ दहशत माजविण्यासाठी व त्यांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सराईतांपासून गुन्हेगारीत पाय ठेवलेल्या नवख्या गुन्हेगारांना देखील आता पिस्तूल सहजारित्या उपलब्ध होत आहेत. तेच त्रासदायक ठरत आहेत.
पिस्तूलांचा वापर वाढला..!
गुन्हेगारीचा कोयता पॅटर्न प्रसिद्ध असताना कोयत्यासोबतच पिस्तूलाने ढिशक्यांव-ढिशक्यांव करण्याचाही पॅटर्न फोफावला आहे. गुन्हेगाऱ्यांच्या मते कोयत्याने आधी तोडायचे अन् मग क्रूरतेसाठी व दहशतीसाठी गोळ्या झाडल्या आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळ्या झाडूनच खून झाला. नंतर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचीही गोळ्या झाडून व नंतर कोयत्याने वारकरून खून केला. सोबत पिस्तूलांमधून अधून-मधून दहशतीसाठी ढिशक्यांव-ढिशक्यांवही होते.
परराज्यातून येतात पिस्तूल….
पिस्तूलाचे रॅकेट पुण्यात चालविले जाते. ते परराज्यातून स्वस्थात पिस्तूल आणून दुप्पट किंमतीने विक्री करतात. बक्कळ पैसा या मार्गाने मिळत असल्याने अनेकजण या मार्गावर आले आहेत. बिहार, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशातून पिस्तूले आणली जातात. येथे ५ हजारांपासून पिस्तूले आणत तेच पिस्तूल हवे तसे व गरजेनुसार किंमतीने विकली जातात. पुर्वी पुण्यापर्यंत पिस्तूल पुरवणारे एक रॅकेट होते. पुण्यात विक्री करणारे दुसरे रॅकेट. पण, आता परिस्थिती बदलली आहे.
गोळीबारीच्या घटना..
यापूर्वीच्या काही घटना वाडेबोल्हाईत किरकोळ वादानंतर हवेत गोळीबा. कोथरूडमध्ये पुर्ववैमन्यासातून तरुणाचा खून, गोळीबारही. बिबवेवाडीत वैमनस्यातून जामिनावर सुटलेल्या गुंडावर गोळीबार. कोंढव्यात दोन गुन्हेगारांच्या बैठकीत चुकून ते झालेला गोळीबार. जिल्हा प्रमुखाच्या गाडीवर गोळीबार. मंगळवार पेठेत गोळीबाराची घटना यापूर्वी घडल्या आहेत.