Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ ची वाट पाहणाऱ्या पुणेकरांची, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2026 | 03:12 PM
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

पिंपरी :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ ची वाट पाहणाऱ्या पुणेकरांची, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असले तरी, औपचारिक उद्घाटनाची तारीख ठरलेली नाही. दरम्यान, उर्वरित चार स्थानकांच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यामुळे आता १२ ऐवजी थेट १६ स्थानके एकाच वेळी प्रवाशांसाठी खुली होण्याची चिन्हे आहेत.

सुरक्षा मंजुरी आणि कामाची स्थिती

पहिल्या टप्प्यातील माण ते बालेवाडी (आर. के. लक्ष्मण म्युझियम) दरम्यानच्या १३ किलोमीटर मार्गाला आणि १२ स्थानकांना २३ जुलै रोजीच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. या टप्प्यातील सुमारे ९६.५ टक्के काम पूर्ण झाले असून जिने व अन्य किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत.

दुसऱ्या बाजूला, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय आणि जिल्हा न्यायालय या उर्वरित चार स्थानकांच्या सीएमआरएस मंजुरीसाठी आवश्यक ती कागदपत्रे व डेटा अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीनंतर या स्थानकांना मंजुरी मिळताच ती पहिल्या टप्प्याशी जोडली जातील. प्रत्यक्ष उद्घाटन होईपर्यंत सर्व १६ स्थानकांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय घडामोडी आणि उद्घाटनाचा मुहूर्त

मेट्रोच्या उद्घाटनाच्या संदर्भात पीएमआरडीए ने मुख्यमंत्री कार्यालयाकडे आधीच पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मेट्रो उद्घाटनाचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. यातच शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींना बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने, दोन्ही दौऱ्यांचा मेळ घालून या मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा : पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

आयटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप

दुसरीकडे, अवघ्या औपचारिक सोहळ्यासाठी पूर्ण झालेली मेट्रो सेवा रोखून धरल्याने हिंजवडी आणि बालेवाडी परिसरातील नागरिक व आयटी कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दररोजच्या भीषण वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पहिला टप्पा तातडीने सुरू करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्ष आणि आयटी फोरमकडून केली जात आहे.

Web Title: The inauguration of the hinjawadi shivajinagar metro is being delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • metro news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

ज्ञानेशकुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मोदी अन् शाहांनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
1

ज्ञानेशकुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मोदी अन् शाहांनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
2

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान
3

PM Modi: ‘मोदी म्हणजे विष्णूचा अवतार…’, भूतानच्या पंतप्रधानांचे आश्चर्यकारक विधान; भारताचा गौरव करून दिले मोठ्या भावाचे स्थान

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
4

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.