Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

विशाल लॉन्स चौक हा एमआयडीसी महामार्गावरील महत्त्वाचा चौक असून, या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. चौकातून विविध दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होत होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2026 | 12:30 AM
वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : वडगाव मावळ एमआयडीसी महामार्गावरील विशाल लॉन्स चौकात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी चौक बंद करून यू-टर्नची व्यवस्था सुरू केली. या उपाययोजनेमुळे चौकातील वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली असून, वाहतूक कोंडी कमी झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

विशाल लॉन्स चौक हा एमआयडीसी महामार्गावरील महत्त्वाचा चौक असून, या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. चौकातून विविध दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होत होती. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन वडगाव मावळ पोलिसांनी चौकातील वाहतुकीचे नियोजन करत चौक बंद करून यू-टर्नची व्यवस्था केली. त्यामुळे वाहनांना नियंत्रित पद्धतीने वळसा घेऊन पुढे जाता येत असून, चौकातील वाहतुकीचा खोळंबा कमी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताचा धोका

मात्र, वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उपाययोजनेनंतरही या मार्गावर बेशिस्तपणे रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करण्याचा प्रकार सुरूच असल्याने नवीन समस्या निर्माण झाली आहे. काही वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः मोठ्या वाहनांची तसेच चारचाकी वाहनांची रस्त्यावर बेशिस्त पार्किंग झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना वळसा घेत पुढे जावे लागत आहे. त्यामुळे अचानक वाहने समोर येण्याची शक्यता असून, या ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मागणी

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेचे नागरिकांकडून स्वागत होत असतानाच, रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांना सूचना देऊनही प्रकार सुरू राहिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यू-टर्नची व्यवस्था प्रभावी ठरत असली, तरी त्यासोबत रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे. पोलिसांनी या ठिकाणी नियमित पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असला, तरी बेशिस्त पार्किंगचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर याच ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा  : PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Web Title: The traffic police have streamlined the traffic on the vadgaon midc road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Road Traffic
  • Traffic Police
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप
1

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.