ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवावयाची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयाशी किंवा वडगाव मावळ विधी सेवा समितीशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा "गुड ऑफ सर्व्हंट" संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली आहे.
वडगाव-तळेगाव नगरपंचायत हद्दीतील विशाल लॉन्स चौक परिसरातील एमआयडीसी रस्त्यावर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ला परिसरातील डोंगरकडा कोसळून नंदू दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि वर्षभरापूर्वीच विवाह झालेला त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
पाटण गावात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
वडगाव शहरातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, वडगाव-कातवी शहर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मावळ तालुक्यातील जांभुळ फाटा परिसरात गाई, बैल व वासरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
दीपाली तांबे या मंचर येथील रहिवासी असून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शासनाच्या जनगणना संदर्भातील कामासाठी त्या सकाळी वाहनाने निघाल्या होत्या. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गालगत कान्हे फाटा परिसरात त्यांच्या वाहनाला भरधाव…