Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचे पाणी आणि ढिगाऱ्यामुळे अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 06, 2025 | 01:53 PM
Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील धराली येथे मंगळवारी (5 ऑगस्ट) झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण उत्तराखंडमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. या आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या महापुरात रस्ते, घरे, दुकाने, सर्वकाही पाण्यात वाहून गेले आहे, नदीच्या पाण्यात अनेक वाहनेही वाहून गेली आहेत. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

उत्तरकाशीमध्ये पुण्यातील मंचर भागात राहणारे सुमारे २४ नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या टॅग करत या पर्यटकांचा शोध घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी यातील काही पर्यटकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही दिले आहेत.

ढगफुटीत उद्ध्वस्त झालेलं उत्तराखंडमधील धराली गाव नक्की कसं आहे? लोखो पर्यटकांचं का आहे आवडतं ठिकाण?

“अलिकडेच झालेल्या ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील पुणे येथील मंचर येथील सुमारे २४ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखी आहेत. माननीय@pushkardhamiji आणि @ukcmo यांना विनंती आहे की त्यांनी कृपया हस्तक्षेप करावा आणि त्यांना लवकरात लवकर वाचवावे.

अडकलेल्या काही व्यक्तींमध्ये हे समाविष्ट आहे:
1. अशोक किसन भोर – 9890600661
2. सविता शंकर काळे – 9527085169
3. अशोक टेमकर – 9867571585
4. लीला रोकडे – 9130346544
5. माणिक ढोरे – 9822364243
6. मारुती शिंदे – 9284153045
7. समृद्धी जंगम – 9936819132
8. सतीश मांगडे – 9766663401
9. लीना जंगम – 9769621996
10. पुरुषोत्तम – 9881403519
11. संगीता वालू – 8830146903
12. शिंदे गहिनीनाथ – 9881930966
13. अरुणा सातकर – 9860758977
14. विठ्ठल खेडकर – 9405851609
15. सुनीता ढोरे – 7499490903
16. नितीन जाधव – 9325666487
17. मंगल – 8805255991

Around 24 citizens from Manchar, Pune, Maharashtra are stranded in Uttarakhand due to the recent cloudburst. Their families are extremely distressed as there has been no contact with them for the past 24 hours. Requesting Hon. @pushkardhami ji and @ukcmo to kindly intervene and… — Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2025

दरम्यान, मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचे पाणी आणि ढिगाऱ्यामुळे अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळेचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एक उंच इमारत दोन भागांमध्ये मोडली आणि पाण्यात वाहून गेली. लोक जीव वाचवण्यासाठी या इमारतींखाली इकडे तिकडे धावतानाही दिसत आहेत. पण पाण्याच्या प्रवाह इतका वेगवान होता की, कोणालाही स्वत: चे जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. जो कुणी प्रवाहात आला तो वाहून गेला अशी भयावह स्थिती काही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे.

खरंतर, डोंगरात मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी अचानक वाढले आणि त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माम झाली. डोंगरातून पाण्यासोबतच मातीचा ढिगाराही खाली वेगाने वाहून आला. काही मिनिटांतच या जोरदार प्रवाहाने संपूर्ण परिसरात हाहा:कार. माजवला. या विनाशकारी पुरामुळे गंगोत्री राष्ट्रीय महामार्गही अनेक ठिकाणी तुटल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि काही क्षणातच सर्व काही उद्ध्वस्त झाले.

IND vs ENG: 3 खेळाडू ज्यांनी इंग्लंड दौऱ्यावर केले सर्वांना चकीत, कोणालाच नव्हती अपेक्षा!

मदत आणि बचाव कार्य सुरू

या आपत्तीचे अनेक हृदयद्रावक व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी जमिनीवर रेंगाळताना दिसत आहेत. लोक कसे तरी ढिगाऱ्यातून बाहेर पडून नदीच्या प्रवाहापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे पाय चिखलात बुडत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, धाराली बाजारपेठ आणि जवळपासच्या भागातील अनेक हॉटेल्स, होमस्टे आणि दुकाने पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. यावेळी चारधाम यात्रा सुरू आहे, त्यामुळे अनेक यात्रेकरू आणि पर्यटक देखील या आपत्तीत बळी पडण्याची भीती आहे.

आपत्तीची माहिती मिळताच, लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तातडीने बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. लष्कराने २० हून अधिक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले. तथापि, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्यांमुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि केंद्र सरकारनेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर देखील सज्ज आहेत, परंतु खराब हवामानामुळे उड्डाण करणे शक्य नाही.

Web Title: Uttarkashi cloudburst 24 tourists from pune stranded in uttarkashi supriya sule releases list of names of missing tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Flood situation
  • supriya sule
  • Uttarakashi

संबंधित बातम्या

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
1

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा
2

मंत्री शंभूराज देसाई अनवाणी पोहचले शेतकऱ्यांच्या बांध्यावर; माणमधील आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने
3

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने

Sanjay Raut : “भो*** सरकार आमचं आहे का? ही हरामखोर लोक; टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली
4

Sanjay Raut : “भो*** सरकार आमचं आहे का? ही हरामखोर लोक; टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.