Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav: ‘व्हायरल सजावट’ ते ‘सोशल मीडिया रील्स’! पुण्यात गौरी आगमनासाठी डिजिटल ट्रेंड्सचा नवा ‘टच’

Ganeshotsav: सोशल मीडियावर सध्या कोणत्या प्रकारच्या सजावटीला पसंती मिळत आहे, कोणत्या थीमचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत, हे पाहून पुढील सजावटीची कल्पना निवडली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 07:34 PM
pune ganeshotsav 2026

pune ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावरची सजावट घरात, गौरीच्या रूपाला ‘ट्रेंडिंग’ टच
  • इन्स्टाग्राम-यूट्यूबवरील सजावटीच्या कल्पनांचा घरगुती गौरी सजावटीवर प्रभाव
  • गौरी सजावटीसाठी शोधल्या जातात नवनवीन संकल्पना 
पुणे/Ganeshotsav: गौरी आगमनाचा उत्साह आता केवळ पारंपरिक पूजाविधी आणि सजावटीपुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सजावटीच्या कल्पना, आकर्षक थीम आणि ‘रील्स’मधील ट्रेंड पाहून त्याच धर्तीवर गौरी सजवण्याची क्रेझ पुण्यातील महिलांमध्ये वाढताना दिसत आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर पाहिलेल्या सजावटीच्या कल्पनांना आपल्या घराच्या जागेनुसार आणि उपलब्ध साहित्याप्रमाणे वेगळा ‘टच’ देत गौरीची सजावट केली जात आहे.

दरवर्षी गौरी सजावटीसाठी नवनवीन संकल्पना शोधल्या जातात. यंदा मात्र सोशल मीडिया हा त्यासाठीचा महत्त्वाचा ‘आयडिया हब’ ठरत आहे. एखाद्या घरात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीची झलक देणारी सजावट केली जाते, तर दुसरीकडे एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आकर्षक थीम घरच्या घरी साकारली जाते. सजावट पूर्ण झाल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचीही उत्सुकता असते.

गौरीच्या पारंपरिक रूपाला आधुनिक सजावटीची जोड देताना फुलांची आरास, मातीची भांडी, जुन्या वस्तू, लाकडी साहित्य, दिवे, कापड आणि नैसर्गिक साहित्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे सजावट केवळ सुंदर दिसण्यापेक्षा तिच्यामागे एक ‘कथा’ किंवा संकल्पना असावी, याकडेही लक्ष दिले जात आहे.

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

विशेष म्हणजे, सोशल मीडियावर सध्या कोणत्या प्रकारच्या सजावटीला पसंती मिळत आहे, कोणत्या थीमचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत, हे पाहून पुढील सजावटीची कल्पना निवडली जात आहे. त्यामुळे गौरी सजावटीतही ‘ट्रेंड’ आणि पारंपरिकतेचा अनोखा मेळ पाहायला मिळत आहे.

जात्यावर दळणाऱ्या गौरीची थीम 
जात्यावर दळणारी गौरी; जुन्या संसाराची आठवण

पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीची आठवण करून देणारी थीम यंदाच्या गौरी सजावटीत पाहायला मिळत आहे. जात्यावर दळण करत असलेल्या गौरीची प्रतिकृती, आजूबाजूला धान्य, पाट-वरवंटा, मातीची भांडी आणि जुन्या काळातील घरगुती वस्तू अशी मांडणी करून जुन्या संसाराचे चित्र उभे करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पाहिलेल्या ‘रस्टिक’ आणि पारंपरिक सजावटीच्या कल्पनेतून ही थीम साकारण्यात आली असून, जुन्या काळातील स्त्रीच्या दैनंदिन जीवनाची आठवण करून देणारी ही मांडणी लक्षवेधी ठरत आहे.

गाडीत बसलेली गौरी

नेहमीच्या देव्हाऱ्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नातून यंदा गाडीच्या थीमवर गौरी सजविण्यात आली आहे. जुन्या काळातील गाडी किंवा बैलगाडीच्या धर्तीवर सजावट करून त्यात गौरीला विराजमान करण्यात आले आहे. फुलांची आरास, पारंपरिक वस्तू आणि प्रकाशयोजनेची जोड देत संपूर्ण देखावा तयार करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील हटके थीमपासून प्रेरणा घेत घरच्या उपलब्ध वस्तूंमधून ही सजावट साकारण्यात आली आहे. त्यामुळे गौरीच्या पारंपरिक रूपासोबतच सजावटीची कल्पकता आणि ‘फोटो फ्रेंडली’ मांडणीही पाहायला मिळत आहे.

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

महालक्ष्मीच्या रूपात विराजमान गौरी
यंदा काही घरांमध्ये गौरींना महालक्ष्मीच्या रूपात सजविण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पारंपरिक साडी, दागिने, मुकुट आणि आकर्षक अलंकारांनी गौरींची सजावट करून त्यांना महालक्ष्मीचे रूप देण्यात आले आहे. सोशल मीडियावरील अशा सजावटीच्या कल्पनांपासून प्रेरणा घेत घरच्या घरी हा सुंदर साज साकारला जात आहे.

Web Title: Viral decoration and digital social media trend follow punekars for gauri agman ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
1

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

‘श्रीमंत’ बाप्पाचा राजेशाही थाट! दगडूशेठच्या चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य
2

‘श्रीमंत’ बाप्पाचा राजेशाही थाट! दगडूशेठच्या चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’
3

Ratnagiri: कामे अपूर्ण अन् खड्डे ठेवण्याचा अनोखा विक्रम; इंदापूर पट्टा वाहतूक ‘कोंडीचा हॉटस्पॉट’

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
4

Thane Ganesh Visarjan: ठाणेकरांची पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला साथ; हजारो किलो निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.