Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ‘पाणी’ पेटणार; PMC ला नाेटीस देण्याचे विखे-पाटलांचे आदेश; नेमके प्रकरण तरी काय?

राज्यात मोठ्या महापालिका असेलल्या शहरांनी पाणी वापराबाबत पुर्नप्रक्रिया करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिकांना आदेश देण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 18, 2025 | 07:28 AM
पुण्यात ‘पाणी’ पेटणार; PMC ला नाेटीस देण्याचे विखे-पाटलांचे आदेश; नेमके प्रकरण तरी काय?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुणे शहराला हाेणाऱ्या पाणी पुरवठ्याचा वाद पुन्हा एकदा उचल खाणार आहे. मंजुर काेट्यापेक्षा अधिक पाणी का उचलता अशी नाेटीस महापािलकेला पाठवा असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. तसेच अतिरीक्त पाण्याची मागणी करताना किती प्रमाणात पाण्यावर पुर्नप्रक्रीया केली जाते याची माहीती कळवावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पुणे महापालिकेला १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर असताना त्यांची २२ टीएमसी पाण्याची मागणी आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर मंत्री विखे पाटील यांनी पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात वरील माहीती दिली.  ठाणे, मुंबईप्रमाणे पाण्याबाबत पुणे महापालिकेने भागीदारी घ्यायला हवी, असे मतही त्यांनी मांडले. पुणे महापालिकेने काही महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाला २१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. त्याबाबत सरकारला ही पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याबाबत विखे पाटील यांचे लक्ष वेधले.

‘पुणे महापालिकेचा अतिरिक्त पाणी कोटा मंजूर करण्याबाबत आपल्याकडे प्रस्ताव आला नाही. त्याची माहिती निश्चित घेऊ. पुणे महापालिका किती प्रमाणात पाण्याचे पुर्नप्रक्रिया करते हे त्यांनी सांगावे.  तसेच सांडपाणी प्रकल्प राबवून किती पाणी नदीतून सोडणार या अटींची पूर्तता केल्याशिवाय जादा पाणी देण्याची मागणी मान्य करू नये, असे माझे मत आहे’, अशी स्पष्ट भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली. त्याबाबत महापालिका आणि जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना केली आहे.
पाण्याची पुर्नप्रक्रिया होणार आहे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम महापालिकेचे आहे. बांधकामाला परवानगी देताना याचा विचार व्हायला हवा. बांधकाम व्यावसायिकांचा त्रास नागरिकांना नको, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: आनंद वार्ता! नद्याजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

मुंबई, नवी मुंबईने स्वतःची धरणे बांधताना निधी दिला. ठाण्याने धरण बांधले आहे. पुणे महापालिकेने धरणाबाबत भागीदारी करायला हवी. पाणी मागणी करणे सोपे आहे. नव्याने पाणी निर्मिती करताना अतिरिक्त पाण्याची मागणी करताना भागीदारी केली पाहिजे. सुमारे ३० ते ४० टक्के पाणी पुर्नप्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे पाण्याचा कोटा वाढवून देताना जलसंपदा विभागाला अडचण येणार नाही, याकडे पुणे महापालिकेचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

राज्यात मोठ्या महापालिका असेलल्या शहरांनी पाणी वापराबाबत पुर्नप्रक्रिया करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिकांना आदेश देण्यात येतील. विखे पाटील म्हणाले, सर्व मोठ्या शहरांनी पाण्याचे संवर्धन केले पाहिजे. सातत्याने शेतीच्या पाण्यावर आऱक्षण टाकून बिगर सिंचन आरक्षण वाढून शेतीच्या पाण्याला तूट आहे.  शहरांसह महापालिकांनी पाणी संवर्धनची जबाबदारी घेतली पाहिजे. पुण्यासह राज्यातील सर्व महापालिकांनी ३० ते ४० टक्के पाण्याची पुर्नप्रक्रिया करायला हवी. त्यामुळे शेतीचे पाणी वाढू शकते.
– राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री

कालवा समितीची बैठक लवकरच
जलसंपदा मंत्री या नात्याने उजनी धरण क्षेत्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच घेतली. कुकडी धरण प्रकल्पांतर्गत प्रथमच नगर जिल्ह्यात बैठक घेतली. आता पुण्यासाठी स्वतंत्र कालवा सल्लागार समिती बैठक लवकरच घेणार असल्याचे जलसंपदामंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Water resources minister radhakrushna vikhe patil order to issued notic to pune carporation for more water use of approve quota

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 07:28 AM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • radhakrushna vikhe patil
  • Water problem

संबंधित बातम्या

Pune Rain News: सावधान! खडकवासल्यातून १४ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद अन् शाळांना थेट…
1

Pune Rain News: सावधान! खडकवासल्यातून १४ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद अन् शाळांना थेट…

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच
2

Ahilyanagar: “आम्ही ओबीसींचा गैरसमज दूर करू”; राधाकृष्ण विखे पाटलांचे सूतोवाच

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?
3

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?

Pune News : खडकवासला बोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, आठवडाभरात खोदकामाला होणार सुरुवात
4

Pune News : खडकवासला बोगद्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, आठवडाभरात खोदकामाला होणार सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.