Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात होतोय बदल; गोंदिया, चंद्रपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच आता पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे जरी असले तरी पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2026 | 07:55 AM
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात होतोय बदल; गोंदिया, चंद्रपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात होतोय बदल; गोंदिया, चंद्रपूरसह अनेक भागांत पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत.
  • बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.
  • विदर्भातील हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मध्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात होताना दिसत आहे. विदर्भातील हवामानावर याचा फरक दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा अनुभव मिळत आहे. त्यातच आता पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे जरी असले तरी पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यानंतर तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात बुधवारी सायंकाळनंतर वातावरणात गारवा वाढल्याने थंडीची जाणीव होऊ लागली. सकाळच्या सुमारास नागपूरसह विदर्भातील अनेक भागांत धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे बुधवारी नागपुरात कमाल तापमान २९.६ अंश तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदविले.

दरम्यान, दिवसा उन्हामुळे वातावरण काहीसे उष्ण जाणवत असले तरी सायंकाळी ५ वाजल्यानंतर गारवा वाढत आहे. अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदिया येथे सर्वात कमी १४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले.

पुढील 5 दिवसांत तापमानात वाढ

काही ठिकाणी दृश्यमानता २ हजार ते ४ हजार मीटरपर्यंत नोंदवली. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकले. किनारपट्टीच्या भागात या वादळाचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटरपर्यंत पोहोचला. या हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष प्रभाव विदर्भावरही जाणवणार आहे. सध्या कमाल तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज असला तरी त्यानंतर थंड वारे वाहू लागतील. त्यामुळे पुढील आठवड्यात विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

FAQ

1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे?

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

2. विदर्भात कशा प्रकारचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे?

काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

3. महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याचे कारण काय आहे?

पश्चिम बंगालच्या मध्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Weather conditions in maharashtra are changing rain is likely in several areas nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

IND vs NZ Weather Update: वेलिंग्टनच्या वेगवान हवेत सुरू होणार महामुकाबला! पाच दिवस कसे राहणार हवामान?
1

IND vs NZ Weather Update: वेलिंग्टनच्या वेगवान हवेत सुरू होणार महामुकाबला! पाच दिवस कसे राहणार हवामान?

राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता
2

राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather: हवामानात बदल, दिवसा अंगाची लाहीलाही अन् रात्री हवेत गारवा, तुमच्या शहराची स्थिती नक्की काय
3

Maharashtra Weather: हवामानात बदल, दिवसा अंगाची लाहीलाही अन् रात्री हवेत गारवा, तुमच्या शहराची स्थिती नक्की काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.