पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उदय कुमार राय या तरुणाचे नाव असून तो मोशीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. उदय कुमार रायची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून मला भाजप आमदार महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली असून मी लवकरच त्यांना जीवे मारणार असल्याचा फोन आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.
हेदेखील वाचा: तुमच्यात हिंमत असेल तर…; संजय राऊतांचे अमित शाहांना खुले चॅलेंज
आज सकाळी पिंपर- चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रुमला आज सकाळी एक कॉल आला. या कॉलवर संबंधित तरूणाने आपल्याला भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. आज मी त्यांना मारणार आहे. असे सांगितले. यानंतर पोलिसांनी कॉलचे लोकेशन ट्रेस करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.
पण,यापूर्वीही महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 2023 मध्येही असाच धमकीचा फोन आला होता.त्यावेळी त्या संशयित आरोपीने महेश लांडगे यांच्याकडे 30 लाखांची खंडणीही मागितली होती. महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या परिवर्तन हेल्पलाईनवर हा धमकीचा फोन आला होता.
हेदेखील वाचा: डेंग्यूच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त, संशोधनातून समोर आला नवा अहवाल