Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

Kudal News: या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली, या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी हे किरकोळ जखमी झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 03:03 PM
Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…
Follow Us
Close
Follow Us:

कुडाळ-मालवण मार्गावर तिहेरी अपघात
स्कूटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू
अपघातग्रस्त स्कूटीला ठोकर बसल्याने दुचाकीस्वर जखमी

कुडाळ: कुडाळ-मालवण मार्गावर कल्पना अपार्टमेंट समोर सोमवारी सकाळी सुमारे ११.१० वाजता झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात स्कुटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त  स्कुटीला ठोकर बसून एक दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला आहे.

या अपघात प्रकरणी ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर हा नेरूर येथून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी हा ट्रक कल्पना अपार्टमेंट समोर आल्यावर अचानक व धोकादायकरीत्या आपल्या ट्रकचा वेग कमी केला.

यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या स्कुटीवरील स्वार निलम निलेश मेस्त्री (वय ३५, रा. नेरूर साईटेंब, ता. कुडाळ) यांनी अचानक ब्रेक लावला. त्यात त्या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली, या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी (वय २४, रा. रोयुडीयेवाडी, नेरुर तर्फ हवेली देऊळवाडा, ता. कुडाळ) हे किरकोळ जखमी झाले.

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

त्याच्या डाव्या हातास व कंबरेला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५. रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याला ताब्यात घेतले, ट्रक पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, कुडाळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी जखमी मोटारसायकलस्वार मुकुंद मार्गी यांनी ट्रकचालकाविरोधात तक्रार दिली. पुढील तपास कुडाळ पोलिस करत आहेत.

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील रावतळे-विंध्यवासिनी रस्त्यानजिक गुरुवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा टेम्पो अचानक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधित टेम्पोमधील लोखंडी साहित्य गाडीच्या दर्शनी भागाकडून घसरत थेट महामार्गावर पसरले. त्याच वेळी मागून येणारा दुचाकीस्वार या साहित्याच्या अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. प्रसंगावधान राखत त्याने वाहन बाजूला घेतले. दरम्यान, शाळेची बसही त्या मार्गान जात होती. रस्त्यावर पडलेल्य साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळस घालून पुढे न्यावे लागले.

Web Title: Two bikes and truck accident in kudal women death on the spot sindhudurg news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
1

धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पैशांसाठी सासरच्यांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
2

पैशांसाठी सासरच्यांकडून छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?
3

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

Delhi Airport : मोठा अपघात टळला! दिल्ली विमानतळावर दोन विमानांची टक्कर, सर्व प्रवासी सुरक्षित
4

Delhi Airport : मोठा अपघात टळला! दिल्ली विमानतळावर दोन विमानांची टक्कर, सर्व प्रवासी सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.