Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

Baramati Power Outrage: शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणा, विद्युत पंप, घरगुती उपकरणे, दुकाने व विविध व्यवसायांवर वीजखंडित होण्याचा थेट परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असून, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2026 | 04:20 PM
Baramati, Mahavitaran, Power Cut, Load Shedding

Baramati, Mahavitaran, Power Cut, Load Shedding

Follow Us
Follow Us:
  • बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये वारंवार व अवेळी वीजपुरवठा खंडित
  • पूर्वसूचनेशिवाय होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यापारी त्रस्त
  • शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांच्या नेतृत्वात महावितरणला निवेदन.
Baramati Power Outrage: बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच लघुउद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनियमित भारनियमन आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे बारामती तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी केली आहे.

याबाबत भापकर यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन दिले आहे. वीजपुरवठ्यातील वारंवार होणाऱ्या खंडितपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित भारनियमनामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, शेतकरी, व्यापारी आणि लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट

विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणा, विद्युत पंप, घरगुती उपकरणे, दुकाने व विविध व्यवसायांवर वीजखंडित होण्याचा थेट परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असून, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.

बारामती तालुक्यातील अनियमित भारनियमन तातडीने थांबवावे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा तसेच नियोजित भारनियमन असल्यास त्याची पूर्वसूचना नागरिकांना द्यावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.वीजपुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असून, वारंवार होणाऱ्या खंडितपणामुळे निर्माण झालेली गैरसोय दूर करण्यासाठी महावितरणने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Sangamner Farmers Protest News: संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात राडा! आक्रमक शेतकऱ्यांकडून

सदर निवेदन देताना हनुमंत भापकर यांच्यासह वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख दत्ता लोणकर, माज जिल्हाप्रमुख सुनील शिंदे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख ॲड अनिल शेडगे, संभाजी शिंदे, भगवान गोफणे, जयराम सणस, प्रताप बामणे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Punebaramati frequent power outrage unscheduled load shedding shiv sena agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • baramati
  • Crisis of Load Shedding
  • mahavitaran
  • Power cut

संबंधित बातम्या

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
1

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
3

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
4

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.