Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivajirao Kardile Passes Away: राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन; नगर जिल्ह्याच्या राजकारणात शोककळा

शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. त्यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक नेते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2025 | 11:51 AM
Shivajirao Kardile Passes Away: राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन; नगर जिल्ह्याच्या राजकारणात शोककळा
Follow Us
Close
Follow Us:
  • शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन
  • बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
  • 2009 मध्ये अपक्ष म्हणून आमदारपदावर निवडून आले

Shivaji Kardile Passes Away:   राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडला. मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात आपले स्थान निर्माण केले. शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. त्यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक नेते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

खराब डाएटमुळे शरीरात सडते शौच, बद्धकोष्ठतेसाठी हार्वर्ड डॉक्टरांकडून 4 देशी उपाय; मेहनतीशिवाय होईल पोट रिकामे

शिवाजीराव कर्डिले यांचा नगरशहाराजवळील बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. माजी मंत्री व आमदार म्हणून आपले स्थान निर्माण केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशा विविध पक्षांत त्यांनी वेगवेगळी पदेही भुषवली.

ते 2009 मध्ये अपक्ष म्हणून आमदारपदावर निवडून आले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली, पण पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 मध्ये पुन्हा आमदारकी लढवत विजय मिळवला, तर 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. त्यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवाजीराव कार्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Pune Police Transfer News: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदली; गुन्हे आणि वाहतूक शाखेत मोठा फेरबदल

“राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत! भावपूर्व श्रद्धांजली!” अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Web Title: Rahuri mla shivaji kardile passes away mourning in nagar district politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • BJP Politics

संबंधित बातम्या

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा
1

BJP Thane Meeting: एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी भापजने टाकलं जाळं: ठाण्यात भाजपच्या आढावा बैठकीत स्वबळाचा नारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.