
Raigad News: जेष्ठांना मिळणार 7 हजार रुपयांचे मानधन; अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेत दिली माहिती
Maharashtra TET 2025 exam : १४ हजार गुरुजींनी दिली टीईटी, जिल्हाभरातील ३६ केंद्रांवर होती परीक्षा
अलिबाग ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी या योजनांची माहिती दिली. व्यासपीठावर अध्यक्ष प्रफुल्ल राऊत आणि उपाध्यक्षा चारुशिला कोरडे उपस्थित होते. कोणतीही आपत्ती आल्यावर रायगडचा युवक फाउंडेशनला संपर्क साधून सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले. बैठकीत नंदू तळकर, मेघना कुलकर्णी, प्रणिता वर्तक, आर. के. घरत आणि संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच सभासद उपस्थित होते. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रायगडचा युवक फाउंडेशनशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रायगडचा युवक फाउंडेशनशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले. (फोटो सौजन्य – Pinterest)
केंद्र सरकारने ७० वर्षावरील जेष्ठांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत तर महाराष्ट्र राज्य परिवहन कडून एसटी प्रवासात ५० टक्के सवलत त्याचबरोबर मालमत्ता करात ३० टक्के सवलत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य समस्यासाठी सरकारी रुग्णालयात मोफत उपचार आहेतच, सोबत खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. यामध्ये सरकारकडून ३ विभागात कार्डची आखणी केली असून वय वर्ष ८० वर सुपर कार्ड, वय ७० च्या वर मध्यम कार्ड आणि ६५ वर्षावरील सर्व योजना प्राप्त होणार सांगितले.
या योजना मिळविण्यासाठी वयाची ६५ वर्ष पुर्ण झाली असतील त्याचे भारत सरकारचे अथवा महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिक ओळखपत्र शासनाच्या ईसेवा केंद्रात काढावे असे मार्गदर्शन अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी केले. यावेळेस प्रा. डॉ. जयपाल पाटील म्हणाले, ज्या जेष्ठ नागरिकास कोणतीही पेन्शन मिळत नाही, त्यांना आता दरमहा ७ हजार रुपये मिळणार असून, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, मंदिरे पाहण्यास वर्षाला १५ हजार रुपये अनुदान मिळणार असून, निराधार जेष्ठाना राहण्याची व जेवणाची सोय मोफत महाराष्ट्र शासन करणार आहे.