Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?

वन्य प्राण्यांसाठी राखीव असलेल्या कायद्यांना धाब्यावर बसवून काही जणांनी बेकायदा दगडी कुंपण करुन घेतलं. या सगळ्या भोंगळ कारभारावर प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 11, 2026 | 12:30 PM
Karjat News : माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर; वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?
Follow Us
Close
Follow Us:
  • माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर;
  • वन्यप्राण्यांचे रस्ते बंद करण्यांना अभय कोणाचं ?
कर्जत/ संतोष पेरणे : माथेरान शहर हे वन जमिनीवर वसले असून या ठिकाणी असलेली वन संपदा वन्य प्राण्यांचे आदिवास समजला जातो.याच माथेरानमध्ये वन नियम आणि कायदे राज्याच्या अन्य भागापेक्षा वेगळे आहेत.मात्र सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपरा मागील काही वर्षात सुरू झाली आहे.दरम्यान शहराच्या जंगल भागात सध्या वन नियम धाब्यावर बसवून दगडी कुंपण घातली जात असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष यांनी वन्यप्राण्यांचा मार्ग बंद होत असल्याबद्दल आक्षेप घेऊन असे बांधकाम तत्काळ हटवावे आणि संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

ब्रिटिशांनी वसवलेल्या माथेरान मध्ये वन संपदा लक्षात घेऊन कडक कायदे बनवले आहेत.जंगल भाग मोठ्या प्रमाणात असल्याने जंगली प्राणी यांची संख्या देखील मोठी असून असे प्राणी जंगलात कुठेही फिरावेत.त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी माथेरान मधील वन कायद्यात कुठेही दगडी बांधकाम करून कुंपण घातले जाऊ नये तसेच आपले मालकीचे भुखंड कुंपण घालून बंदिस्त करू नये असे सूचित केले आहे.

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

जंगलातील प्राण्यांचा आदिवास असलेले माथेरानचे जंगल सध्या अनधिकृत बांधकाम आणि झाडे तोडून काँक्रीटचे जंगल निर्माण करण्याचा सुरू असलेला प्रयत्न यामुळे संकटात आले आहे.दररोज झाडे तोडली जात असताना वन विभाग सुस्त असून झाडांना विजेचे शॉक देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रकार देखील माथेरान मध्ये सुरू आहे.झाडे तोडणे आणि दगडी कुंपण यामुळे प्राण्यांचे आदिवास धोक्यात आले असून माथेरान मधील या बंदिस्त कार्यपद्धतीमुळे प्राण्यांना जंगलात सैर करणे कठीण होऊन बसले आहे.

Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

माथेरानमधील एल्फिन्स्टन रोड भागातील एल्फिस्टन बंगला या 36 एकर जमिनीच्या क्षेत्रात असलेल्या बंगल्यात सुरू आहे.एवढ्या मोठ्या परिसरात विस्तीर्ण पसरलेली जमीन आणि परिसराला जुन्या झाडांचा विळखा यामुळे हा परिसर प्राण्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे.मात्र हाच एलफिस्टन बंगला माथेरान नगरपरिषद आणि माथेरान वन विभाग यांच्या नजरेच्या बाहेर असल्याचे दिसून येत आहे. या 36 एकर जमिनीमध्ये व्यापलेल्या बंगल्यात बहुसंख्य जमीन झाडांनी व्यापली आहे. मंकी पॉईंट रोड ते दरीपर्यंत आणि पुढे टोपीवाला बंगला ते मंकी पॉईंट पर्यंत व्यापला आहे.याच एलफिस्टन बंगल्याच्या मालक हे कंपाउंड करून हे जंगल बंद करत आहेत.

येथे दगडी कुंपण घातले जात असून वन्यजीव,प्राणी यांची वहिवाट बंद होणार आहे. माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असून देखील जंगल हे बंदिस्त झाले तर वन्यजीव प्राण्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यात जमिनीला दगडी कुंपण घातल्यास प्राण्यांचा जंगलातून येण्याजण्याचा मार्ग बंद होऊ शकतो आणि जंगल बंद झाल्यास प्राण्यांचे येणे जाणे बंद होणार आहे.त्यामुळे काही प्राणी माथेरान जंगलातून स्थलांतरित होऊ शकतात.

त्यामुळे वन नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले बांधकाम तत्काळ थांबवावे आणि संबंधित यांच्यावर मुंबई वन जमीन कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार सदर जमीन शासन जमा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस माथेरान शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी महसूल अधीक्षक आणि माथेरान नगरपरिषद कडे केली आहे.तर वन विभाग आपले नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नसल्याने माथेरानमधील जनतेकडून नाराजी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Karjat news forest act in tatters in matheran who is immune to closing roads for wildlife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Matheran Hill Station
  • matheran news

संबंधित बातम्या

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
1

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल
2

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.