कर्जत /संतोष पेरणे : माथेरान म्हणजे पर्यटक आणि ट्रेकर्सची हक्काची जागा. उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा याठिकाणी कायमच पर्यटकांची गर्दी असते. मात्र अशातच आता पावासळ्याच ट्रेनला गेलेल्या एका तरुणाबरोबर झालेली दुर्घटना समोरआली आहे. हा ट्रेकर गेल्या आठवड्याभरापासून गायब होता पाोलिसांकडून याचा तपास देखील जारी होता आणि अखेर आज याचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात 7 सप्टेंबर रोजी हा तरुण ट्रेकींग दरम्यान बेपत्ता झाला. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे तसेच अनेक रेस्क्यू टीम कडून बेपत्ता असलेला 31वर्षीय सुरज सिंग या ट्रेकर्सचा शोध सुरू होता. मात्र आज आठव्या दिवशी त्याचा मृतदेह पोलीलांना सापडला आहे.
सुरज सिंग हा 31वर्षीय हे नौदलाचे जवान होते. मुंबईतील डॉकयार्ड येथे ते सेवेत सुरु होते. 7 सप्टेंबर रोजीसुरज सिंग लोणावळा येथील डोम धरण आणि नंतर कर्जत तालुक्यातील पाली भूतिवली धरण परिसरात पुढे गार्बेट येथे जात असल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट होत आहे. पाली भूतिवली धरणाच्या बाजूने माथेरान डोंगरातील गार्बेटवाडी या ट्रेककडे जाणारा रस्ता आहे.सकाळच्या वाजता सुरज यांचे शेवटचे लोकेशन पाली भूतिवली धरणाच्या बाजूला माथेरान डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले होते. ट्रेकर्स गार्बेट ट्रेकसाठी निघताना प्रामुख्याने पाली भूतिवली धरण येथे असलेल्या मोकळ्या जागेत टेन्ट उभा करतात आणि नंतर पहाटेच्या वेळी धरणाच्या बाजूने गार्बेट ट्रेक सुरू करतात. डोम धरण येथून पाली भूतिवली आल्यावर सकाळी आठ वाजता शेवटचे लोकेशन दिसून येत आहे. सूरज सिंग यांच्या मोबाईलची रेंज 7 सप्टेंबरला सकाळी 8 वाजताच्या सुमारास गेली. त्यामुळे पोलीस तापासात ते नक्की कोणत्या मार्गाने गार्बेट गेले किंवा त्याचे पुढे काय झाले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
7 सप्टेंबरा पासून कोणताही संपर्क होऊ न शकलेल्या सुरज चौहान यांच्या नातेवाईकांनी पोलीसांत धाव घेतली. सुरज बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. पोलीसांनी मोबाईलच्या शेवटच्या लोकेशन वरून जिल्हा पोलिस यंत्रणा यांच्याकडून तपास सुरू आहे.मात्र आठ दिवसात या तरुणाचा मोबाईल सुरू झाला नाही आणि त्यामुळे मोबाईल लोकेशन मिळाले नाही.त्याचवेळी सुरज सिंगचा शोध देखील माथेरान डोंगरातील गार्बेट किंवा या ट्रेक चे मार्गावर देखील लागला नाही.कर्जत आणि नेरळ पोलिस यांच्याकडून सुरज सिंग चे तपासासाठी अनेक आदिवासी वाड्यांमध्ये पाहणी करून झाली आहे.त्यामुळे शेवटी आता पोलिसांनी ड्रोन कॅमेरे जंगलात सोडण्यात आले आहेत,त्या कॅमेरे यांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू असून अद्याप सुरज सिंग याचा तपास लागला नाही.त्यामुळे त्याच्या गायब होण्याचे गूढ वाढले असून सुरज सिंग याच्या तपासासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.हेल्प फाउंडेशन तसेच सह्याद्री रेस्क्यू टीम अशा अनेक स्वयंसेवी संस्था सुरज सिंग याच्या शोध मोहिमेत आहेत.
या तरुणाचा मृतदेह माथेरान डोंगरातील पाली भूतिवली धरण ते गार्बेट या मार्गावरील जंगलात आढळून आला आहे.या मृतदेहाची माहिती स्थानिक आदिवासी गुराखी यांना दिसून आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाणे यांना कळवण्यात आले.