Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

नूतनीकरणाचे काम कोणत्याही अडथळ्यांविना सुरू असून हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 01:23 PM
Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
Follow Us
Follow Us:
  • हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
कर्जत/ संतोष पेरणे :  माथेरान या 100 वर्षे जुन्या गिरीस्थान नगरपरिषद चे प्रशासकीय कार्यालय असलेली इमारत हेरिटेज वास्तू म्हणून नोंद आहे.या इमारतीच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम सुरू असून या इमारतीबाबत निर्माण झालेला वादंग नंतर पालिकेकडून कामाला स्थगिती दिल्याची चर्चा आहे.मात्र नूतनीकरणाचे काम कोणत्याही अडथळ्यांविना सुरू असून हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.

माथेरान नगरपरिषद चे हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या कार्यालयाचे नुतनीकरण कामाबद्दल आक्षेप घेतला आहे.100 वर्षे जुनी माथेरान नगरपरिषद कार्यालयाची वास्तू हेरिटेज दर्जा ‘अ’ मध्ये समाविष्ट आहे.माथेरान मधील अनेक वास्तूंना हेरिटेज मध्ये समावेश केला आहे. अशा वास्तूंची दुरुस्ती आणि नुतनीकरण करण्याचे काम माथेरान हेरिटेज समितीच्या परवानगीने होत असते.त्यावेळी हेरिटेज समितीची बैठक अनेक वर्षे झालीच नाही अशी चर्चा आहे.आणि तसे असताना या इमारतीचे नूतनीकरण काम सुरू असल्याने माथेरान पालिकेचे विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांनी आक्षेप घेतला होता माथेरान हे हेरिटेज शहर म्हणून ओळखले जात असून या इमारतीच्या जागेवर पालिकेने शासनाची परवानगी घेऊन ऐतिहासिक ठरेल अशी इमारत उभारावी,तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा भव्य वास्तू उभी करावी जेणेकरून अशी वास्तू पाहण्यासाठी पर्यटक,अभ्यासक येऊ शकतात अशी सर्वसामान्य भावना सीताराम कुंभार यांनी व्यक्त केली आहे.

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

मात्र माथेरान नगरपरिषद सभागृह आणि स्थायी समितीचे मान्यता असलेले ठराव नसताना इमारतीचे काम सुरू आहे. हेरिटेज मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेकडून डीपीआर यांना मान्यता नाही.इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला तांत्रिक मान्यता नाही.माथेरान हेरिटेज समितीची मान्यता नाही,राखीव निधीची तरतूद आहे किंवा कसे याची माहिती सदस्यानं नाही.नियमानुसार निविदा प्रक्रिया कधी राबविली? कोणत्या वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध झाली.हेरिटेज वास्तू नूतनीकरण करण्याचा अनुभव असलेल्या ठेकेदार नेमण्यात आला आहे काय?हेरिटेज समितीच्या बंधनकारक असलेल्या अटी आणि शर्ती यांची पूर्तता झाली आहे काय?असे अनेक विषय समोर आणण्यात आले असून पालिकेने याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

मात्र तरी देखील या इमारतीचे काम जोरात सुरू आहे,ठेकेदाराला काही पेमेंट देखील देण्यात आल्याची चर्चा आहे.त्यामुळे हेरिटेज मालमत्ता यांच्यावर लक्ष ठेवणारी माथेरान पालिका आपल्या कार्यालयाचे नूतनीकरण चुकीचे पद्धतीने करीत असताना शासन अशा कामांवर अंकुश ठेवणार की नाही? असा सवाल सीताराम कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

Karjat News : शेती आणि जनावरांसाठी पाणी अडवणं गरजेचं; नाल्यावर सिमेंट बंधारा टाकण्यात यावा, गावकऱ्यांची मागणी

 

 

Web Title: Matheran news are heritage norms not applicable to matheran municipal building nationalist congresss question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • karjat news
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
1

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.