
माथेरानचे डोंगरात 13आदिवासी वाड्या असून नेरळ माथेरान घाटरस्त्यातील जुम्मापट्टी धनगरवाडा पासून किरवलीवाडीपर्यंत असलेल्या 13 किलोमीटर मार्गात या आदिवासी वाड्या वसल्या आहेत. अनेक पिढयांपासून आदिवासी आणि धनगर समाजाचे लोकांची वस्ती तेथे वास्तव्य करीत असून वन विभागाच्या जमिनीवर या वाड्या वसल्या आहेत.
वन विभाग रस्ता तयार करण्यासाठी जमीन देत नसल्याने येथील आदिवासी आपल्या रस्त्याचा प्रश्न स्वतः एकतर येऊन श्रमदान करून सोडवत असत. मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचे काम मंजूर करून आणले आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते ऑनलाईन पद्यतीने भूमिपूजन झाले होते. मात्र त्याआधी आसलवाडीपर्यंत जाण्यासाठी नेरळ-माथेरान घाटरस्त्यातून जुम्मापट्टी येथून जाता येते. त्यामुळे सर्व आदिवासी एकत्र येत श्रमदान करून स्वतःच्या वाडीत जाणारे रस्ते बनवून घेतले. ते सर्व रस्ते पक्के नसल्याने पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून जात असतात.त्यामुळे दरवर्षी या रस्त्यांची दुरुस्ती स्थानिक आदिवासी लोकांना करावी लागते.
सर्व आदिवासी वाडया देश स्वातंत्र्य होण्याआधी 100 वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र वन कायदा अस्तित्वात आला आणि त्या ठिकाणच्या वाड्यांची जमीन वन विभागाच्या मालकीची झाली. वन जमिनीवर वसलेल्या या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते बनविले जात नाहीत. परंतु शासनाने 3/2 अंतर्गत प्रस्ताव यांच्या माध्यमातून जमीन देण्यात येऊ लागल्याने वन जमिनीतून रस्ते निर्माण होऊ लागले. राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांनी माथेरान डोंगरातील रस्ता तयार करण्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीमधून किरवली भागाकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या 13 किलोमीटर मार्गात किरवली वाडी,आषाणेवाडी,सावरगाववाडी,बोरीचीवाडी,मना धनगर वाडा,धामणदांड,चिंचवाडी,सागाचीवाडी,आसलवाडी, नाण्याचा माळ,बेकरेवाडी,जुम्मापट्टी धनगरवाडी,या वाड्या आहेत.सध्या आषाणे वाडी आणि सावरगाव वाडी मध्ये रस्त्यांची कामे सुरु असून तशाप्रकारे हे काम पुढे पुढे जाणार आहे.
रस्त्याच्या दरम्यान असलेल्या ग्रामपंचायती ..
किरवली,माणगाव तर्फे वरेडी,उमरोली,आसल
आदिवासी वाड्या
किरवली वाडी,आषाणेवाडी,सावरगाववाडी,बोरीचीवाडी,मना धनगर वाडा,धामणदांड,चिंचवाडी,सागाचीवाडी,आसलवाडी, नाण्याचा माळ,बेकरेवाडी,जुम्मापट्टी धनगरवाडी,या वाड्या आहेत.सध्या आषाणे वाडी आणि सावरगाव वाडी
रस्त्याचे एकूण अंतर ..
13.5 किलोमीटर रस्त्यात चार ठिकाणी नाल्यावर पूल बांधले जातील.
लहान साकव यांची निर्मिती
मंजूर वन जमिनीचे प्रस्ताव ..
किरवली ग्रामपंचायत,उमरोली ग्रामपंचायत (वावरले ग्रामपंचायत ),आसल ग्रामपंचायत यांचा देखील यात समावेश असणार आहे.