Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : नेरळमध्ये वाहतूक कोंडी ; रोजच्या समस्येला नागरिक हैराण

 दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे नेरळ स्थानक परिसरात वाहतूक कोडींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. नेरळचा विकास मुंबईचे उपनगर म्हणून झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 23, 2025 | 02:10 PM
Raigad News : नेरळमध्ये वाहतूक कोंडी ; रोजच्या समस्येला नागरिक हैराण
Follow Us
Close
Follow Us:

रायगड /संतोष पेरणे :  दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे नेरळ स्थानक परिसरात वाहतूक कोडींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. नेरळचा विकास मुंबईचे उपनगर म्हणून झाला आहे. त्यामुळे रहिवाशी संख्या वाढली असून वाहनांची संख्या देखील वाढली आहे.त्याचा परिणाम नेरळ गावातील तीन ठिकाणी दररोज वाहतूक कोंडीची समस्या स्थानिक रहिवाशी यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागली आहे.दरम्यान,वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

नेरळ हे गाव मध्य रेल्वेने जोडलेले असल्याने या ठिकाणी घर घेऊन राहायला येणारे यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यात नेरळ या ठिकाणी रात्री उशिरा पर्यंत उपनगरीय लोकल मुंबई येथून येत असतात.त्याचवेळी माथेरान सारख्या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या गावात मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध आहे.त्यामुळे मुंबई शहरातून या भागात राहायला येणारे यांची संख्या वाढली आहे.त्याचा त्यात नेरळ मध्ये राहायला येणारे लोक यांची संख्या वाढत आहे.त्यामुळे नेरळ गावात वाहनांची संख्या वाढली असून त्यामुळे नेरळ गावातील वाहतूक कोंडी दररोज नेरळ गावात दिसून येत आहे.त्यामुळे नेरळ गावातील रहिवाशी हे दररोज वाहतूक कोंडीला नेरळकर कंटाळले आहेत.त्यामुळे नेरळ गावातील जनता मध्य रेल्वेवर उड्डाण पुल कधी होणार अशी मागणी सातत्याने करीत आहे.

नेरळ गावात मध्य रेल्वेच्या फटकात दररोज वाहतूक कोंडी होत असून गेल्या काही वर्षात मालवाहू गाड्यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे फाटक हे बहुतांश वेळ बंदच असते.त्याचा परिणाम नेरळ गावात हुतात्मा हिराजी पाटील चौकातील अंबिका नाका पर्यंत वाहने यांची रांग लागते.तर पलीकडे गंगानगर आणि मातोश्रीनगर खिंडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात.दुसरे वाहतूक कोंडीचे ठिकाण हे कल्याण कर्जत रस्त्यावर खांडा गावाच्या हद्दीत असून तेथे ममदापूर फाटा येथे रस्ता अरुंद असल्याने आणि त्यात रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत.त्याचवेळी माथेरान फाटा या ठिकाणी जकात नाका आणि हुतात्मा चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली असून नेरळ माथेरान कर्जत आणि कल्याण अशा चार ठिकाणी जाणारी वाहने मोठया प्रमाणावर एकत्र आल्यावर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.

उड्डाण पूल
नेरळ येथील मध्य रेल्वेच्या फाटक असलेल्या ठिकाणी रस्ता अरुंग असल्याने पंचवटी भागात उड्डाण पुल बनविण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.त्यासाठी मध्य रेल्वे कडून जागा देखील निश्चित करण्यात आली असून कल्याण कर्जत राज्यमार्ग वरून हा उड्डाण पूल नेरळ भीमाशंकर राज्यमार्ग असा जोडला जाणार असल्याची माहिती देण्यात येत असते.

भुयारी मार्ग …
सध्याच्या नेरळ फाटक येथे रस्ता अरुंद असल्याने आणि रस्त्याच्या कडेला रहिवासी घरे असल्याने तेथे उड्डाण पुल होणार नाही हे जवळपास नक्की झाले आहे.त्यामुळे नवीन ठिकाणी उड्डाण पुल बांधण्यात आल्यानंतर सध्याच्या फाटक असलेल्या ठिकाणी लहान वाहनांसाठी भुयारी मार्ग बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक करीत आहे.हा रस्ता बंद झाल्यास नेरळ पाडा भागातील रहिवाशी यांना पाडा भागाचा पुढचा भाग असलेल्या मातोश्री नगर मध्ये जाण्यासाठी अडचणीचे होणार आहे.त्यामुळे लहान वाहनांसाठी तेथे भुयारी मार्गाची मागणी स्थानिक करीत आहेत.

Web Title: Raigad news traffic jam in neral citizens are confused by the daily problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 02:10 PM

Topics:  

  • Karjat
  • neral
  • raigad
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
1

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
2

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत
3

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत

Khalapur News : ग्रामीण विकासासाठी पुढाकार, गोदरेजच्या अंगणवाडी प्रकल्पातून १०० कुटुंबांना लाभ
4

Khalapur News : ग्रामीण विकासासाठी पुढाकार, गोदरेजच्या अंगणवाडी प्रकल्पातून १०० कुटुंबांना लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.