कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय उभारले गेले, ज्याद्वारे स्थानिक अनागोंदी कारभारावर लक्ष ठेवण्यास आणि नागरिकांच्या समस्यांवर काम करण्यास मदत होईल.
दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाल्यास नेरळमधील नागरीकरण आणखी वाढेल आणि शासनाच्या विविध विभागांचा निधी देखील नेरळचे विकासासाठी येईल असा विश्वास निवृत मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी व्यक्त केला.
कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर शिरसे गावच्या हद्दीत निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.त्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.
नेरळ माथेरान घाट रस्त्यात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.मध्यवर्ती जुमापट्टी भागात नेरळ बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने माथेरानच्या कुशीत असलेले जुमापट्टी विभागात भर पावसात वृक्षारोपण करण्यात आले.
पावसाळ्यात धबधब्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळते.अशाच एका धबधब्यावर वर्षासहली साठी आलेल्या तरुणाची दुचाकी चोरीला गेली होती. मात्र नेरळ पोलिसांनी अवघ्या 24 तासात दुचाकी चोराला बेड्या ठोकल्या आहेत.
एकीकडे नालेसफाईला विलंब तर दुसरीकडे भिवपुरी स्थानकाजवळ पादचारी पुलाकडे स्थानिक प्रशासनचं दुर्लक्ष होत आहे. भिवपुरी स्थानक परिसरात पादचारी पुलावर पावसाचे पाणी साचून राहत आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नाही आणि त्यामुळे शासनाने नेमलेले प्रशासक हे ग्रामपंचायत कार्यालयात आठ आठ दिवस फिरकत नाहीत.
नेरळमध्ये शिवसेना ठाकरे गटाने पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला. शहरप्रमुख बंडू क्षीरसागर यांनी कठोर कारवाईची मागणी करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर पाठवण्याची मागणी केली.
स्थानिक पातळीवर कोणत्याही शेतकऱ्यांना मोबदला न देता राजकीय वरदहस्त असल्याने लाल मातीचे खोदकाम केले जात आहे. या मातीच्या तस्करीबाबत आदिवासी शेतकरी आक्रमक झाले आहेत.