
Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग
चाकण–शिक्रापूर मार्गावर धुळीचे लोट; खड्ड्यांचा रस्ता वाहतूकदारांसह नागरिकांसाठी डोकेदुखी
रेवस करंजादरम्यान धरमतर खाडी ओलांडून वाहने आणि प्रवासी दोघांना ने-आण करण्यासाठीची ही जलवाहतूक सेवा, मुख्य उद्देश मुंबई-अलिबाग प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणे हा आहे, मात्र जेट्टींच्या बांधकामातील तांत्रिक अडचणी, कंत्राटदार बदल, निधी वितरणातील विलंब अशा कारणांमुळे हा प्रकल्प अनेकदा ठप्प झाला आहे, तर याच मार्गावर राज्य शासनाने करंजा-रेवस पूल उभारण्याच्या प्रकल्पाला गती दिली आहे.
रो-रो प्रकल्पासाठी आधीच कोट्यवधींचा खर्च केला गेला आहे. आता पुन्हा जेट्टीचे उर्वरित काम, नौकांचे तांत्रिक परीक्षण, संचालनासाठी अतिरिक्त निधी याकरिता मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. म्हणूनच पूल तयार होत असताना रो-रोची गरज कोणाला? आणि निधीचा चुराडा का केला जातोय? असे प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत. पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले तर रो-रो सेवेचा उपयोग मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पण पुलाचे काम विलंबित झाले तर रो-रो सेवा तात्पुरता पर्याय ठरू शकते, रेवस-करंजा पुलाचे काम सुरू असताना रो-रो प्रकल्प पुन्हा चालू करण्यामागील हेतू स्पष्ट करणे, हे शासन व प्रशासनाची जबाबदारी ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पूल तयार झाल्यावर चारचाकी आणि अवजड वाहने सहजतेने जाऊ शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे पारंपरिक सेवा आणि रो-रो सेवा यांच्या माध्यमातून खाडी ओलांडण्याचा प्रश्नच उरणार नाही. मग अशा स्थितीत रो-रोसाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. सध्या खाडीतून पारंपरिक तर सेवा सुरू आहे. यातून प्रवासी वाहतूक नियमित होते, मात्र वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने मर्यादा जाणवतात, याच कारणामुळे रो-रो सेवेला मागणी असली, तरी पुलाच्या बांधकामामुळे तिचे महत्त्व कमी होणार आहे, असेही काही नागरिकांचे मत आहे.
उरणमधील स्थानिक नागरिक अजित थळी यांनी सांगितलं आहे की, मी आजाराने ग्रासलेला असल्याने मला प्रवास करायचा असेल तर सुखकर प्रवासाचा मार्ग निवडेन, म्हणजेच जर पूल आणि रो-रोबाबत विचाराल तर मी पुलावरून जाणे पसंत करेन, रो-रो मार्ग बदलता प्रवास करणे नक्कीच कंटाळवाणा आणि खर्चिक ठरेल. त्यामुळे या सेवेच्या वापरापेक्षा पुलाचा वापर अधिक होईल, तर पूल सुरू झाल्यास रो-रो सेवा बंद पडेल. यामुळे या सेवेवर झालेला अनाठाई खर्च फुकट जाईल.