रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांची तपासणी; फुकट्यांकडून 4.9 लाखांचा दंड वसूल, फक्त एकाच दिवशी...
भारतीय रेल्वे सर्वात आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पण, यातील बहुतांश प्रवासी हे विनातिकिट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच रेल्वे अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी तपासणी केली जात आहे. त्यातच नांदेड विभागात दोन दिवसांपूर्वी रेल्वेने व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवली. यात एकाच दिवशी १२०२ विनातिकीट प्रवासी तसेच बुक न केलेल्या सामानासह प्रवास करणाऱ्यांवर करण्यात आली.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एकूण ४.९ लाख दंड व तिकीटांची रक्कम वसूल करण्यात आली. या मोहिमेत मनमाड-छत्रपती संभाजीनगर, परभणी-परळी, परभणी नांदेड, आदिलाबाद-मुदखेड पूर्णा अकोला या मार्गावरील अनेक एक्सप्रेस व प्रवासी अशा 21 गाड्यांची तपासणी करण्यात आली. सवखंड एक्स्प्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, बंगळुरू एक्सप्रेस, नादिग्राम एक्सप्रेस, पनवेल एक्सप्रेस, यशवंतपुर एक्सप्रेस, श्रीगंगानगर एक्सप्रेस, नर-काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, संबलपुर एक्सप्रेस तसेच पूर्णा आदिलाबाद, पूर्णा-अकोला आणि नरसापूर-नगरसोल चेन्नई एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांच तपासणी मोहीमेत समावेश होता.
हेदेखील वाचा : रेल्वेने प्रवास करताय… मग लाल अन् निळ्या डब्यात काय फरक असतो माहिती आहे का? जाणून घ्या
दरम्यान, ही मोहीम सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. जे. विजय कृष्ण, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेत 32 तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दल यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यापुढेही राबवली जाणार तपासणी मोहीम
या तपासणी मोहिमेचा उद्देश 66 विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवणे, प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. नेहमी वैध तिकिटासह प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी, अशा तीव्र तपासणी मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येतील.
– प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक