मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. आज सकाळी राज ठाकरेंनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं पत्र फडणवीसांनी लिहिल्यानंतर आता यावर ठाकरे गटाकडून (Thackeray group) यावर टिका होत आहे.
[read_also content=”रमेश केरेंनी टोकाची भूमिका घेतली – शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/ramesh-kere-took-an-extreme-stance-sharad-pawar-336829.html”]
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून टिका होत आहे. खासदार अरविंद (arvind sawant) सावंत यांनी भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र हा भाजपाचच षडयंत्र आहे, समोर पराभव दिसत असल्यामुळं त्यांची ही खेळी आहे. जनतेचा ठाकरे गटाला मिळणार प्रतिसाद पाहून भाजपाला आपला पराभव समोर दिसत आहे. त्यामुळं ते आता अर्ज मागे घेणार असून, राज ठाकरेंना भाजपानेच पत्र लिहियला सांगितले आहे. त्यामुळं भाजपाचेच हे षडयंत्र आहे, अशी बोचरी टिका खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर केली आहे.